आज गणित दिवस.. जाणून घ्या महत्व आणि इतिहास

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

आज राष्ट्रीय गणित दिन हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला होता. हा दिवस संपूर्ण जगभरात ‘गणित दिन’ म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांनी गणिताला वेगळी ओळख देवून काही प्रमेय आणि सूत्र दिली ज्यांचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि जे बरेच फायद्याचे ठरतात.

दरवर्षी 22 डिसेंबरला देश रामानुजन यांच्या योगदानाची आठवण काढतो. त्यांनी फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इनफायनाइट सीरिज, नंबर थिअरी, गणिती विश्लेषण या साऱ्याची सर्वांनाच माहिती दिली. गणित क्षेत्रात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि महावीर यांच्यासह रामानुजन यांचंही नाव घेतलं जातं.

गणिताप्रती सर्वांनाच अभिरुची वाढावी यासाठी हा दिवस इतक्या मोठ्या पातळीवर साजरा केला जातो. अतिशय झपाट्यानं नव्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी झोकून देणाऱ्या नव्या पिढीचा गणिताकडे कल वाढवणं हा त्यामागचा मुख्य हेतू आहे.

श्रीनिवास अयंगर रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये कोईंबतूरच्या ईरोड गावात झाला होता. ते एका ब्राह्मण कुटुंबात जन्मले होते. देश आणि जगातील काही महत्त्वपूर्ण गणिततज्ज्ञांमध्ये त्यांचं नाव गणलं जातं. असं म्हटलं जातं की, त्यांना बालपणापासूनच गणिताची आवड होती. त्यांनी लहान वयातच गणितात ऐतिहासिक काम करायला सुरुवात केली. जेव्हा ते 12 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी त्रिकोणमितीमध्ये प्रभुत्व मिळवले होते आणि स्वतःहून अनेक प्रमेये विकसित केली होती. त्यांना गणिताची एवढी आवड होती की, त्यांना गणितात पूर्ण गुण मिळायचे पण इतर विषयात नापास व्हायचे.

26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या 33 व्या वर्षी क्षयरोगामुळे रामानुजन यांचं निधन झालं. 2015 मध्ये त्यांच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारा ‘The Man Who Knew Infinity’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग साकारण्यात आले होते. 1976 मध्ये ट्रिनिटी कॉलेजच्या पुस्तकालयात एक जुनं रजिस्टर मिळालं होतं. ज्यामध्ये अनेक प्रमेय आणि सूत्र लिहिण्यात आली आहेत. या प्रमेयांना अद्याप कोणीही सोडवू शकलं नाहीत. हे रजिस्टर ‘रामानुजन नोट बुक’ या नावेही ओळखलं जातं.

सन 2021 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1887 मध्ये तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या श्रीनिवास रामानुजन यांच्या सन्मानार्थ हा दिवस गणित दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या, ज्यांच्या गणितीय समीकरणांमुळे ब्रह्मांडातील अनेक रहस्ये उलगडली, असे भारतभूमीवर जन्मलेले महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची आज जयंती. अशा या महान व्यक्तिमत्त्वाला विनम्र अभिवादन आणि सर्वांना राष्ट्रीय गणित दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Leave A Reply

Your email address will not be published.