आते तरी ‘एसटी’ सुरू करा हो..

0

 जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

गेल्या अनेक महिन्यापासून बसेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसह सामन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करून अधिक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. आता शाळा महाविद्यालये सुरू झाले असून अनेक नागरिकांना महत्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागतो. परंतू लालपरी बंद असल्याने विद्यार्थ्यांना सुध्दा बस बंदचा त्रास होत असून शाळेत हजेरी लावणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे आते तरी लालपरी सुरू करा हो अशी मागणी विद्यार्थी पालकांनी केली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून परिवहन मंडळातील संघटनांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे. परिवहन मंत्री व एसटी कर्मचारी यांचा महिन्याभरापासून ताळमेळ जुळून येत नसल्याने शेवटी एसटी कर्मचारी संघटना न्यायालयात गेली आहे. मात्र लालपरी आगारात धूळ खात असून महामंडळाचे लखोचे नुकसान होत आहे.

महत्वाची बाब म्हणजे कर्मचाऱ्यांनी अल्पशा पगारावर किती दिवस जीवन जगायचे असा त्यांचा मोठा प्रश्न आहे. दररोज ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी तसेच अन्य ठिकाणी प्रवाशांना घेऊन जीव धोक्यात घालून चालकाने किती दिवस कमी पगारावर जगायचे महागाई वाढत असताना येवढ्या कमी पगारात मुलांचे शिक्षण, पालनपोषण, आरोग्य असे अनेक प्रश्न त्यांच्याही समोर आहे. त्यामुळे शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी त्यांनी संप पुकारला आहे.

यात बस बंद असल्यास खासगी वाहनाने प्रवास मजबुरीने करतात. पण विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याने होत आहे. तेव्हा शासनाने व परिवहन मंत्र्यांनी यावर तोडगा काढून विद्यार्थ्याच्या भवितव्याचा विचार करावा व विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरातील बस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पालक करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.