मोदी, शहांचे कौतुक करत उदयनराजेंचा भाजपमध्ये प्रवेश !

0

नवी दिल्ली: साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरच भाजप पुढं चाललाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा देशातील लोकशाही मजबूत करण्याचं काम करताहेत. त्यांच्या कामानं प्रभावित होऊन मी भाजपशी जोडून घेण्याचा निर्णय घेतला,’ असं उदयनराजे यांनी यावेळी सांगितलं.

नवी दिल्लीत उदयनराजेंच्या प्रवेशाचा खास सोहळा पार पडला. भाजपाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रावसाहेब दानवे, रिपब्लिकन नेते रामदास आठवले हे यावेळी उपस्थित होते. उदयनराजे यांनी यावेळी मोदी व शहांची तोंडभरून स्तुती केली. ‘देश एकत्र, एकसंध व मजबूत कसा राहील, यासाठी मोदी व शहा हे काम करत आहेत. त्यांच्या कामामुळं देशातील प्रत्येक राज्यात भाजपची वाढ होतेय. लोक या पक्षात येऊ इच्छित आहेत,’ असं उदयनराजे म्हणाले. काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याच्या निर्णयाचंही त्यांनी स्वागत केलं. ‘यापुढं मी मोदी, शहा यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपमधील माझ्या सहकाऱ्यांच्या साथीनं समाजासाठी काम करेन,’ अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.