मोठी बातमी.. पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

दिल्लीतून एक मोठी बातमी समोर समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्लीतून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या दहशतवाद्याकडून AK-47 बंदूकसह  मोठ्याप्रमाणात दारुगोळा जप्त केला आहे. पूर्व दिल्लीतील शास्त्री नगरमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने UA(P) Act, एक्सप्लोसिव्ह अॅक्ट  आणि आर्म्स अॅक्ट  अंतर्गत या दहशतवाद्याला अटक केली आहे. मोहम्मद अशरफ उर्फ ​​अली असे अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याचे नाव आहे. हा दहशतवादी पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी असून, तो मोहम्मद अशरफ अली अहमद नूरी या नावाने दिल्लीच्या शास्त्रीनगरमध्ये राहत होता. पोलिसांनी दहशतवाद्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये एके-47 रायफल, काडतुसे, एक हँड ग्रेनेड, 2 पिस्तूल आणि 50 काडतुसे जप्त कऱण्यात आली आहेत.  याशिवाय, बनावट कागदपत्रांच्या मदतीने दहशतवाद्याने बनवलेले भारताचे ओळखपत्रही पोलिसांच्या हाती लागले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सोमवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी मोहम्मद अशरफ उर्फ अली नावाच्या पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली.

दिल्ली पोलिसांना अनेक दिवसांपूर्वी माहिती मिळाली होती की एक पाकिस्तानी दहशतवादी राजधानीत लपला आहे. पाकिस्तानी दहशतवाद्याला पकडण्याचा आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा दिल्ली पोलीस सातत्याने प्रयत्न करत होते. सध्या दहशतवादी मोहम्मद अशरफ यांची चौकशी केली जात आहे. त्याच्यासोबत आणखी किती लोक आहेत हे जाणून घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. दहशतवादी मोहम्मद अशरफचे साथीदार इतर अनेक ठिकाणी लपले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. दिल्ली पोलीस इतरही अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.