मुलीस पळून जाण्यास मदत केल्याचा संशय, घरात घुसून महिलेचा केला विनयभंग; गुन्हा दाखल

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील शिरूड येथील एका महिलेच्या पतीने मुलीस पळून जाण्यास मदत केल्याचा संशयावरून एकाने घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.

रवींद्र हिरामण वैराळे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तालुक्यातील शिरूड येथील अमीन अकबर खाटीक याने मुलीला पळून जाऊन लग्न करण्यास मदत केल्याचा संशय व्यक्त करत रवींद्र वैराळे याने त्याच्या घरात घुसून त्याच्या पत्नीचा विनयभंग करून तिला दमदाटी केली.

याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र वैराळे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.