उपमहापौर गोळीबार प्रकरण; सहावा संशयित अटकेत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जळगाव शहराचे उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर शुल्लक कारणावरून गोळीबार करणाऱ्या सहाव्या संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना २५ जुलै रोजी रात्री घडली होती. सुदैवाने या हल्ल्यात ते बचावले. होते. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गुन्ह्यातील बेपत्ता संशयित भूषण बिर्‍हाडेला मंगळवारी रोजी पोलिसांनी अटक केली. शुल्लक कारणावरुन झालेल्या वादात उपमहापौर पाटील यांच्यावर किरण राजपूत, उमेश राजपूत, मंगल राजपूत, जुगल बागुल, महेंद्र राजपूत व भूषण बिर्‍हाडे यांनी पाटील यांच्या घरी जाऊन गोळीबार केला होता.

या प्रकरणातील पाच संशयिताना आधीच अटक करण्यात आली होती. यानंतर सहाव्या संशयिताचा कसून शोध सुरू असतांना त्याला देखील अटक करण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.