सहकारात राजकारण नकोच…!

0

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. सहकार क्षेत्रातील जिल्हा बँकेची निवडणूक म्हटली की अत्यंत चुरशीची होती. तथापि जळगाव जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी मात्र त्याला फाटा दिला आहे. सहा वर्षापूर्वी सदर बँकेची निवडणूक झाली. त्यावेळी सुध्दा माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी पुढाकार घेऊन जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असून त्यात राजकारण नको म्हणून सर्वपक्षीय पॅनेल बनवून निवडणुकीच्या खर्चाला फाटा दिला होता. त्यावेळी बँक डबघाईला आलेली होती.

सर्वपक्षीय पॅनेलचे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांचे चेअरमनपदासाठी बँकेने 6 वर्षात नेत्रदिपक अशी मजल मारली. 6 वर्षापूर्वी बॅक क वर्गाच्या दर्जात होती. 6 वर्षानंतर बॅकेला आता अ वर्गाचा दर्जा मिळाला आहे. 100 कोटीचा तोटा भरून काढून बँक नफ्यात आली आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील बँकाची आर्थिक स्थिती चांगली नाही. काही बँकांची निवडणूक जाहीर झाली असतांना सुध्दा त्या बँका निवडणूक खर्च करण्यास असमर्थ ठरलेल्या आहेत. त्यावरून जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेने चांगलीच मजल मारली आहे. त्याचे श्रेय विद्यमान चेअरमन – व्हॉ. चेअरमन, संचालक मंडळाला आणि विशेषत: माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना द्यावे लागेल.

एकनाथराव खडसे यांचा राजकीय अनुभव आणि शेतकऱ्यांविषयी त्यांना असलेली आपुलकी याचा  फायदा बँकेच्या संचालक मंडळाला वेळोवेळी मिळाल्याने बँक सुदृढ स्थितीत आली आहे. नुकतीच बँकेची 104 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने पार पडली. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा पार पडली. विषयपत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले. त्यानंतर एकनाथराव खडसे यांचे मार्गदर्शनपर जे भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात मांडलेले मुद्दे सभासद शेतकऱ्यांना  पसंतीस उतरले. शेतकरी सभासदाकडून जणू बँक संचालक मंडळाला जणू पावतीच मिळाली. बँकेचा  सर्व व्यवहार अत्यंत काटकसरीने हाताळण्याचे चेअरमन-व्हा.चेअरमन व संचालक मंडळाने प्रयत्न केल्यामुळेच बँक नफ्यात येवू शकली.

आता बँकेची निवडणूक होवू घातली आहे. याही वेळी जिल्हा बँकेची निवडणूक अविरोध करण्याच्या दृष्टीने सर्वपक्षीय पॅनल बनविण्यात येत आहे. त्यासाठी विद्यमान जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे हे विशेष. त्यांन एकनाथराव खडसे यांचे मार्गदर्शन मिळते आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना हे महाविकास आघाडी या सत्ताधारी पक्षाचे घटक असून भाजपला सोबत घेवून सर्वपक्षीय पॅनल बनविले जात आहे. त्यासाठी एक कोअर कमेटी बनविण्यात आली प्रत्येक पक्षाचे दोन दोन नेते या कोअर कमेटीत आहेत. या कोअर कमेटीला सर्वपक्षीय पॅनलमधील सदस्य निवडण्याची पूर्व मुभा देण्यात आलेली आहे. कालच या कोअर कमेटीची बैठक झाली. 29 संचालक पैकी एक – दोन जागांचा तिडा सोडला तर बाकी एकमत झाल्याचे माजी मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी पत्रकारांना सांगितले.

विशेष म्हणजे चारही पक्षाच्या संचालकाला चेअरमन पदाची सव्वा सव्वा वर्षे संधी देण्याचाही निर्णय घेतला असल्याचे कळते. चेअरमनपद प्रत्येक पक्षाला सव्वा वर्षे म्हणजे हा अत्यंत महत्वाचा निर्णय असून हा निर्णय म्हणजे जिल्हा सहकारी बँकेत पक्षीय राजकारणाला थारा नाही. ही महत्वाची बा म्हणता येईल. सहकार क्षेत्रात राजकारणाविरहित झाले तर सहकारात होणारा भ्रष्टाचार आपोआप थोंल आणि सहकाराची मालकी भागधारक सदस्यांची खऱ्या खुऱ्या अर्थाने असल्याचे स्पष्ट होते. जिल्हा बँक ही शेतकरी सभासदांच्या मालकीची बँक आहे. शेतकऱ्यांचे हीत साधण्यासाठी राजकारण आडवे येते ते राजकारण अडवे येवू नये म्हणून सहकार राजकारणाला विरहित असावे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत निवडणूकीच्या माध्यमातून एकत्र येवून शेकऱ्यांचे हित जोपासण्याचे काम करताहेत त्याद्दल सर्वच पक्षातील नेत्यांचे अभिनंदन जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलच्या आदर्श इतर जिल्हा बँकेने सुध्दा घेतला पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.