मुंबई पुन्हा हादरली.. 6 वर्षांच्या चिमुकलीसोबत डिलिव्हरी बॉयचं विकृत कृत्य

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मागील  काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात महिलाविरोधी होणाऱ्या अत्याचारांत प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई येथील साकीनाका परिसरात एका 30 वर्षीय महिलेवर अत्याचार करून तिची अमानुष हत्या केली होती. ही घटना ताजी असताना बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली आहे. मुंबईच्या चारकोप परिसरात एका 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत डिलिव्हरी बॉयनं घृणास्पद  कृत्य केलं आहे. याप्रकरणी पीडितेच्या आई वडिलांनी गुन्हा दाखल करताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास चारकोप पोलीस करत आहेत.

आरोपी डिलिव्हरी बॉय चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीत पार्सल देण्यासाठी गेला होता. यावेळी याठिकाणी 6 वर्षीय पीडित मुलगी उभी होती. आरोपीनं तिला तिचा पत्ता विचारला आणि तिने सांगितलेल्या पत्त्यावर घेऊन गेला. याठिकाणी कोण पाहत नसल्याची संधी साधत आरोपीनं पीडितेसोबत जबरदस्तीनं अत्याचार केला.

आरोपी यानंतर नराधम आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या संतापजनक घटनेनंतर पीडित मुलगी वेदनेनं विव्हळत आपल्या आई वडिलांकडे गेली. तिने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. चिमुकल्या लेकीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच संतप्त कुटुंबीयांनी तातडीनं चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांना तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीनं बलात्कारसह पोक्सो कलमाअंतर्गत डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून कुटुंबीयांत आक्रोश आहे. या घटनेचा पुढील तपास चारकोप पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.