मुंबईत आज 1288 नव्या रुग्णांची नोंद ; 67 जणांचा मृत्यू

0

मुंबई : मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आजही मुंबईत 1288 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून 67 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.त्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या तब्बल ६२ हजारांच्या वर गेली आहे.

दरम्यान, मुंबईत मृतांची संख्या आतापर्यंत 3311 झाली असून बरे झालेले 31,856 रुग्ण आतापर्यंत घरी गेले आहेत. बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढतेय. मुंबईत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 62 हजार 62,875 इतकी झाली असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागान दिलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.