पारोळा येथील प्रतिबंधित क्षेत्र कमी करा ; व्यापारी महामंडळची मागणी

0

पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा शहरातील प्रतिबंधीत क्षेत्र कन्टेमेंट झोन कमी करावा  अशी मागणी पारोळा व्यापारी महासंघाच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली आहे.

या बाबत अधिक माहीती अशी की,  मागील २२मार्च पासुन जवळपास तीन महीन्या पासुन शहरातील मुख्य बाजार पेठ बंद आहे,शासनाचे  नियमांचे  पालन करून शहरात वेळोवेळी जनता कर्फु लाकडाॅऊन करण्यात आले आहे. मात्र शहरातील प्रमुख बाजारपेठ बंद होऊन तीन महिन्यापेक्षा ही जास्त कालावदी उलटला असुन अनेक व्यापार्यासह कामगारा वर ही उपासमारीची वेळ आली आहे,तसेच अनेक व्यापार्यांचा खाद्यपदार्थाचा माल  देखील खराब होऊ लागला आहे,तसेच इतर वस्तुचें सुध्दा मोठ्या प्रमाणात सुकसान झाले असल्याची भिती अनेक व्यापार्यानी व्यक्त केली आहे,तसेच हे नुकसान तर बरून निघणारे नाहीच परंतु आता पवसाळा सुरू झाला असुन दुकान बंद असल्याने संपुर्ण दुकानात दुर्गंधी ही पसरण्याची भिती व्यक्त करणायात येत आहे यामुळे शासन व प्रशासनाने बाजारपेठे तील कंटेन्मेंट झोन उठवुन व्यापार्याना दिलासा ध्यावा व पुढील होणार्या नुकसाना पासुन वाचवावे अशी मागणी शहरातील अनेक लहान मोठे व्यापारी व्यवसायीक व कामगार  यांनी एका निवेदना द्वारे जळगांव जिल्हाअधिकारी, उपविभागीय अधिकारी, एरंडोल,पारोळा तहसिलदार, पारोळा मुख्यअधिकारी,पारोळा एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील, पारोळा नगराध्यक्ष करण पवार, यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर अनेक व्यापारी व्यवसायीक,तसेच अनेक कामगांराच्या स्वाक्षर्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.