मुंबईतून तिसरा संशयित दहशतवादी एटीएसच्या ताब्यात

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) दहशतवादी कृत्यासंबंधी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. मोहम्मद इरफान रहमत अली शेख (वय ५०) असं संशयित दहशतवाद्याचा नाव आहे. एटीएसने दोन संशयित दहशतवादी झाकीर हुसेन शेख आणि रिझवान मोमीन यांना ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवसांनी, एटीएसने गुरुवारी या प्रकरणात पुन्हा तिसरी अटक केली.

मोहम्मद इरफान रहमत अली शेख (५०) या संशयिताला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली. एटीएसने उघड केले की, झाकीर आणि रिझवानच्या चौकशी दरम्यान अली शेखच्या भूमिकेबद्दल सांगितले. त्यानंतर त्याला नागपाडा येथील एटीएसच्या कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले आणि गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. एका सुत्राने सांगितले, “सतत चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या सहभागाची कबुली दिली.

“आम्ही त्याच्या घरातून ४९००० रुपये रोख जप्त केले आहेत, जे दहशतवादी कारवायांसाठी होते,” तपासकर्त्याने पुढे म्हटले, “त्याला एका अज्ञात व्यक्तीकडून पैसे मिळाले होते ज्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.”

दिल्लीत अटक करण्यात आलेल्या सहा अतिरेक्य़ांशी संबंधित प्रकरणात इरफान शेखला अटक करण्यात आली आहे. यापूर्वीच जोगेश्वरी येथून एटीएसने झाकीर शेखला, तर मुंब्रा येथून रिजवान मोमीनला अटक केली आहे. या प्रकरणातील मुंबईतून झालेली ही तिसरी अटक आहे.

मुंबईतील दहशतवादाचे पहिले कनेक्शन म्हणजे जान मोहम्मदला १८ सप्टेंबर रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. धारावीत राहणाऱ्या जान मोहम्मदला राजस्थानच्या कोटा येथून मुंबई निजामुद्दीन प्रवासादरम्यान अटक करण्यात आली होती. त्यापाठोपाठच मुंबईतून आणखी दोन जाणांना अटक करण्यात आली. मुंबईतून जोगेश्वरी आणि मुंबईतून दोघांना अटक करण्यात आली होती. तर आज वांद्रे येथून लेडीज टेलरला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित कनेक्शन आढळल्यानेच महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.