मारुती सुझुकीने भारतात डिझेल कार न विकण्याचा घेतला निर्णय

0

नवी दिल्ली :- देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल क्षेत्रातील मारुती सुझुकी इंडियाने 1 एप्रिल 2020 पासून भारतात डिझेल कार न विकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे चेअरमन आर.सी.भार्गवा यांनी गुरूवारी(दि.25) याबाबत माहिती दिली. कंपनीद्वारे देशात विकल्या जाणार्‍या डिझेल वाहनांची भागीदारी सुमारे 23 टक्के आहे.

देशात डिझेलच्या वाढत्या दरांचा आणि भारत स्टेज 6 या अंतर्गत प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने ऑटोमोबाईल क्षेत्रावर लावलेल्या आर्थिक भाराचा जबर फटका या कंपनीला लागल्याचं समोर येत आहे. यामुळे 2020 पासून आपल्या पोर्टफोलिओ मधून सर्व डिझेल कार वगळण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे, असेही भार्गवा यांनी सांगितले. डिझेल इंजिनला BS-VI नियमांनुसार अपग्रेड करण्यासाठी अधिक खर्च होतो, त्यामुळे कार्सच्या किंमती वाढवाव्या लागतात आणि परिणामी विक्रीवर परिणाम होतो, म्हणून कंपनीने डिझेल इंजिन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.