राहुल गांधींच्या विमानात बिघाड : संगमनेर सभा उशिरानं होणार

0

नवी दिल्ली :- पाटणा येथे जात असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विमानाच्या इंजिनात आज सकाळी बिघाड झाला. विमानाच्या कॉकपीटमधील व्हिडिओ त्यांनी ट्विट करून तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली. त्यामुळं राहुल यांना तातडीनं दिल्लीला परतावं लागलं. विमानातील बिघाडामुळं त्यांच्या महाराष्ट्रातील संगमनेर, बिहारमधील समस्तीपूर, ओडिशातील बालासोरमधील नियोजित सभा उशिरानं सुरू होणार आहेत.

राहुल गांधी यांच्या आज बिहारमधील समस्तीपूर, ओडिशातील बालासोर आणि महाराष्ट्रातील संगमनेर येथे प्रचार सभा होणार होत्या. समस्तीपूर येथील सभेसाठी राहुल हे विमानानं जात होते. या उद्भवलेल्या समस्येमुळं संगमनेरसह बिहार आणि ओडिशातील सभा सुरू होण्यास विलंब होणार आहे, असं सांगून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.