माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ED कार्यालयात दाखल

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यांना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरण आणि बदल्यांबाबत चौकशीसाठी ईडीने समन्स बजावला होता.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या कार्य काळामध्ये ज्या पोलिसांच्या बदल्या झाल्या होत्या. तेव्हा मुख्य सचिव सीताराम कुंटे याना चौकशी करिता बोलविण्यात आलं होत. याअगोदर देखील मुख्य सचिव सीताराम कुंटे याना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.

याच प्रकरणामध्ये त्यांची चौकशी झाली होती. माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे ईडी समोर हजर झाले आहेत. या बदल्या कशा झाल्या कोणाच्या सांगण्यावरून झाल्या काय त्यांची प्रक्रिया आहे, याची माहिती घेण्यासाठी सीताराम कुंटे यांना चौकशी साठी बोलविण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस निवृत्त होणारे राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे  यांना सक्तवसुली संचालनालयाने  नोटीस पाठवली होती. त्यांना 25 नोव्हेंबर रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. थेट राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस आल्यानं खळबळ उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.