माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश

0

नवी दिल्ली :- माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी त्यांना भाजपची सदस्यता दिली. दरम्यान, अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून गौतम गंभीर प्रभावित झाले. देश काहीतरी करू इच्छित आहे, म्हणूनच त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

गौतम गंभीरचा क्रिकेटमध्ये मोठा वाटा राहिलेला आहे. तिकिटाच्या विषयावर जेटली म्हणाले की, निवडणूक समिती या विषयावर निर्णय घेईल. यावेळी जेटलींनी नाव न घेता नवाजोत सिंह सिद्धूवर निशाना साधला. ते म्हणाले की, काही क्रिकेटपटू पाकिस्तानचे समर्थक बनले आहेत. परंतु गंभीर सारखे क्रिकेटपटू देशासाठी काही करू इच्छित असल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.