नांद्रा येथे हास्यसम्राट मिर्झा बेग यांनी जिंकली श्रोत्यांची मने

0

पाचोरा :- नांद्रा ता. पाचोरा येथे ग्रामविकास फाऊंडेशन तर्फे आयोजित विनोदी कलाकार मिर्झा बेग यांचा कार्यक्रम “मिर्झा एक्सप्रेस” नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुशिलाबाई तावडे, सामाजिक कार्यकर्ते खलिल देशमुख, अझहर खान, सरला पाटील, सरपंच शिवाजी तावडे, कुरंगीचे सरपंच दिपक मोरे हे उपस्थित होते. येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात ग्रामविकास फाऊंडेशन, नांद्रा तर्फे महिलांनी आयोजित केलेल्या “मिर्झा एक्सप्रेस” या हास्यकल्लोळ कार्यक्रमात विनोदी कलाकार मिर्झा बेग यांनी आपल्या शैलीत खास करून वऱ्हाडी भाषेतील विनोदी किस्से सांगुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी गावातील तसेच परिसरातील महिला, बालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी केले. सुत्रसंचलन श्रध्दा सुर्यवंशी, खुशी तावडे तर आभार महेश गवांदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अमोल तावडे, विशाल तावडे सह आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.