महिला कर्मचार्‍याकडे पाच हजाराची लाच;

0

मुंदडे विद्यालयाचे मुख्याध्यापक व लिपीक रंगेहात!

जळगाव दि. 3-
सेवापुस्तक व कागदपत्रांची फाईल देण्याच्या मोबदल्यात महिला कर्मचार्‍याकडून पाच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंदडे विद्यालयाचे मुख्याध्यापक व लिपीकाला दि.3 रोजी रंगेहात पकडले.
मुंदडे विद्यालय जळगाव येथून लुंकड विद्यालय जळगाव अशी बदली झाल्याने महिला कर्मचार्‍याचे सेवापुस्तक व कागदपत्रांची फाईल देण्याच्या मोबदल्यात तक्रारदार महिलेकडे पाच हजाराची लाच संबंधितांनी मागितली. सदर रक्कम महिला कर्मचार्‍यांकडून संशयितांनी दि. 3 रोजी पंचासमक्ष मुंदडे विद्यालयात स्वीकारताना लाचलुचपत विभागाने आरोपी भरत धुडकू पाटील (57) मुख्याध्यापक पी.एम. मुंदडे विद्यालय, जळगाव, रा. शिवराणा नगर, गुजराल पेट्रोल पंपाजवळ पिंप्राळा वर्ग- 2 तसेच संजय श्रीकृष्ण कुलकर्णी (51)लिपीक, पी.एम.मुंदडे विद्यालय जळगाव रा. श्री मंगलमूर्ती नगर, पिंप्राळा, जळगाव वर्ग -3 यांना रंगेहात पकडले. सदर सापळा विभागाचे पो. नि. निलेश लोधी यांच्या मार्गदर्शनात लावण्यात आला होता. घटनेचा तपास पो. उपनि. जी.एम. ठाकूर हे करीत आहेत. दरम्यान या घटनेने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.