जिल्ह्याभरात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन !

0

शिव प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर रावेर
रावेर दि. 3 –
शिव प्रतिष्ठान संचलित सरस्वती विद्यामंदिर रावेर शाळेत भारतीयांची ज्ञानाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजकुमार जैन सर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले तद्नंतर नंतर सर्व शिक्षकांनी सुद्धा प्रतिमेचे पूजन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली त्यात त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले सर्व जीवन वाहिले, मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून चिखलमाती लोकांनी त्यांच्या अंगावर फेकले, तरीसुद्धा त्या डगमगल्या नाहीत. आजच्या स्त्रियांना जे स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळत आहे त्याचे श्रेय केवळ सावित्रीबाईंना आहे. म्हणून सर्व विद्यार्थिनींकडून बालिका दिनानिमित्त प्रतिज्ञेचे वाचन शाळेतील शिक्षिका सौ ललिता राणे यांनी सर्व विद्यार्थिनींकडून करून घेतले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून संपूर्ण जगभर साजरा करण्यात येतो. शाळेतील शिक्षक श्री सागर पवार सर श्री नितीन पाठक सर यांनी सुद्धा त्यांच्या जिवन कार्याबद्दल विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मौलाना अबुल कलाम आज़ाद वाचनालय
रावेर दि. 3
कर्जोद येथील मौलाना अबुल कलाम आजाद सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात सावित्री बाई फुले यांना त्याच्या प्रतिमेस माजी ग्रा पा सदस्य रघुनाथ सावळे साबिर शेख यानी उपस्थितासह पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी ग्रपा सदस्य रघुनाथ सावळे, साबिर शेख,विनोद सावळे,जमील शेख,फिरोज शेख, अशफाक शेख, प्रदीप सावळे, नितिन सावळे,गणेश सावळे, असंख्ये वाचक मोठयासंख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अध्यक्ष शकील अब्दुल शेख यांनी केले.तर आभार सदस्य जमील शेख यानी मानले.
फुले,शाहू,आंबेडकर वाचनालय
रावेर दि.3
येथील फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात भारतातील प्रथम विद्येची देवता,महीलांच्या शैक्षणिक भाग्यनिर्मात्या ,दलित बहुजन उध्दारक क्रांतीज्योती माता सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त त्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिप व धुप पुजा करुन उपस्थितानी अभिवादन केले. यावेळी.प्रा.एस.बी.महाजन,प्रा.सि.एस.पाटील,कामगार नेते दिलीप कांबळे, माजी नगरसेवकङ.योगेश गजरे,मुख्याध्यापक रविंद्र तायडे,खान्देश माळी महासंघ तालुकाध्यक्ष पिंटू महाजन,पत्रकार शालीक महाजन, मुकेश जिरीमाळी,कालुशेठ,योगेश परागपगारे,संजय उपरास, गोविंदा लहासे,बाळु तायडे,नितीन तायडे, गणेश महाजन,यांचेसह तालुक्यातील असंख्ये वाचक मोठयासंख्येने उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार फुले,शाहू,आंबेडकर सार्व.वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी केले.
सरस्वती विद्यामंदिर शाळा शेंदुर्णी
शेंदुर्णी
आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतीकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. सावित्रीबाईंचे प्रगतशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हिच खरी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन संस्थेेच्याअध्यक्षा कौमुदी साने यांनी सरस्वती शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी केले . सुरुवातीला सुवर्णा महाजन यांनी सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले .यावेळी शाळेतील विद्यार्थ्यानी मनाली पाटील हिने सावित्रीबाईची वेशभुषा करून विद्यार्थ्याना मार्गदर्श केले.विद्यार्थ्यानी सावित्रीबाईच्या जिवन चरित्रावर भाषणे , नाटिका व गाणी सादर करून सावित्रीबाईंच्या शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली .यावेळी वसंत महाजन , कौस्तुभ महाजन , अभय कुलकर्णी, उदय पालखे , कल्याणी कुलकर्णी,ऐश्वर्या साने,शुभदा पालखे , डॉ .कल्पपक साने , ऋचा साने ,शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील , शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शाळेतील विद्यार्थीनी मनस्वी पीटल तर आभार शिक्षीका कुंदा वासनकर यांनी मानले .
गरुड महाविद्यालय
शेंदुर्णी – दि .3
अप्पासाहेब र भा गरुड कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वासुदेव आर पाटील यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीना शिक्षणाच्या प्रवाहातुन बाहेर असलेल्या मुला मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे आवाहन केले , प्रतिमा पूजन महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वसंत पतंगे यांनी केले आभार प्रदर्शन डॉ.ए.एन जिवरग यांनी केले या याप्रसंगी उपप्राचार्य आर जी पाटील, डॉ.संजय भोळे, प्रा डॉ प्रशांत देशमुख, प्रा अमर जावळे प्रा भुषण पाटील,प्रा श्रावण डेहरकर, प्रा रीना पाटील,प्रा,छाया पाटील, प्रा,वर्षा लोखंडे, प्रा संदीप कुंभार, कार्यालयीन अधीक्षक सतिश बाविस्कर भाऊसाहेब ,मुख्य लिपिक हितेंद्र गरुड भाऊसाहेब,संभाजी भाऊसाहेब,बशरत तडवी, राजेंद्र संदनशिव,अतुल लोखंडे आदी शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते
के.सी.अध्यापक विद्यालय
जळगाव
के.सी.ई. सोसायटी च्या अध्यापक विद्यालयातर्फे आंतरवासीयतेमध्ये प.वि.पाटील विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त म बालिका दिन म साजरा करण्यात आला. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. डी. भाटेवाल, प्रमुख पाहुण्या रेखा पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. छात्रध्यापक मनीष बागुल यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित एक सुंदर असे गीत सादर केले.महिला आज राष्ट्रपतींच्या आसनावर बसताय , वेगवेगळ्या पदावर कार्य करताय , न्यायाधीश ,वकील , इंजिनियर , शिक्षिका ते फक्त शिक्षणाच्या जोरावर या शिक्षणाचे द्वार सावित्रीबाईंनी आपल्यासाठी खुले केले नाहीतर महिला फक्त चूल व मूल इतकीच मर्यादित राहिली असती अशा शब्दात उपशिक्षक योगेश भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगेश भालेराव यांनी केले.प्रसंगी अध्यापकाचार्य शालिनी तायडे , साधना झोपे , हेमलता चौधरी सुधीर वाणी सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी तसेच छात्रध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.