पारिट समाजाचा 8 रोजी मुंबई येथे आक्रोश मोर्चा

0

लोहारा ता पाचोरा दि. 3 –
परीट धोबी समाजाला एस सी चे आरक्षण मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी परीट धोबी महासंघातर्फे आझाद मैदान, मुंबई येथे 8 जानेवारी रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश लिंगायत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शासन धोबी समाजाला दुसर्‍या राज्यांमध्ये एस सी चे आरक्षण देते मात्र महाराष्ट्रात सरकार आरक्षणसाठी चालढकल करीत आहे.तसेच विविध योजनांमध्ये धोबी समाजाला मिळाव्यात यासाठी परीट धोबी महासंघातर्फे आक्रोश आंदोलनपुकारण्यात आले आहे.यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व सोनटक्के (संस्थापक अध्यक्ष,परीट महासंघ),अनिल शिंदे(कार्याध्यक्ष),चंद्रकांत सोनवणे(प्रदेश उपाध्यक्ष),शंकरराव निंबाळकर,किसनराव जोर्वेकर, एकनाथराव बोरसे,सुरेश ठाकरे,सर्जेराव बेडिस्कर,प्रभाकर खर्चे,सागर सपके हे करीत आहेत.तरी सर्व जळगांव जिल्ह्यातील समाज बांधवांनी दिशाभूल करणार्‍यांकडे दुर्लक्ष करून समाजाच्या विकास व हितासाठी 7 जानेवारी रोजी निघून 8जानेवारी रोजी आझाद मैदानावर उपस्थिती देऊन सामाजिक जबाबदारी समजून जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन ग्रामीण जिल्हाध्यक्ष रमेश लिंगायत व पाचोरा तालुकाध्यक्ष अरुण लिंगायत यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.