ए.टी. झांबरे विद्यालयात वसंतबहार आनंदोत्सव साजरा

0

 

जळगांव दि. 3 –
केसीई सोसायटी संचालित ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात मवसंतबहार आनंदोत्सवफ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष केसीई कार्यकारणी संचालक लक्ष्मीकांत चौधरी, प्रमुख पाहुणे डॉ संजंय पत्की(संगीत विभाग प्रमुख बहीणाबाई चौधरी विद्यापीठ जळगाव), डॉ हर्षवर्धन जावळे(सदस्य के. सी .ई. सोसायटी ) यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
त्यांनतर इशस्तवन व स्वागत गीत सादर करण्यात आले. त्यांनतर विद्यार्थी जास्वंदी कुलकर्णी आणि सुजल चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.परीमल हस्तलिखित ,कुमार कोष अनक्रमणिका,वैज्ञानिकक्रांती हस्तलिखित यांचे प्रकाशन करण्यात आले.त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2018-2019चे उत्कृष्ट विद्यार्थी वेदांत भगवान वाकळे उत्कृष्ट विद्यार्थीनी धन्वंतरी रावबा देवरे तसेच एन. सी.सी. ची बेस्ट कॅडेट लक्ष्मी कोलते यांना सन्मानित करण्यात आले.
प्रत्येकाने आपल्या अंगी एकतरी कला जोपासावी अशा शब्दात डॉ. संजय पत्की यांनी आपले विचार मांडून मंगेश पाडगावकर यांच्या चिऊ ताई या कवितेचे सादरीकरण केले.गजर माऊलीचा , वाघ्या मुरली ,धनगर नृत्य , शेतकरी गीत , राजस्थानी गीत , गोंधळ अशा विविध नृत्यांवर विद्यार्थ्यांची पाऊले थिरकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी बी कोळी तर आभार आर एन तडवी यांनी मानले .कार्यक्रमाला शालेय समन्वयक शशिकांत वडोदकर, के जी फेगडे , चंद्रकांत भंडारी, ओरिआँन शाळेचे प्राचार्य संदीप साठे, ओरीआँन सी.बी.एस सी. स्कूल च्या प्राचार्या सुषमा कंची , जी पी व्ही पी प्राथमिक विद्यालया च्या मुख्याध्यापिका रेखा पाटील , मुख्याध्यापक डी व्ही चौधरी , पर्यवेक्षिका उषा नेमाडे उपस्थितहोते.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधु भगिनी नी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.