पास धारक विद्यार्थ्यांचे एस. टी. डेपो व्यवस्थापक यांना निवेदन

0

 

पाचोरा दि. 3 –
पाचोरा येथील महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ च्या तर्फे दुष्काळ ग्रस्त विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार्‍या पास संदर्भात विद्यार्थ्यांना गैरसोय होत होती. अनेकांना पास नियमित असून नियमाप्रमाणे मिळत नव्हते तर काहींना सरळ पुढच्या वर्षांपासून नवीन घ्या या भाषेत उत्तर दिले जात होते.तसेच मुलांसाठी व मुलींसाठी पास वितरणाची एकच खिडकी असल्याने विद्यार्थिनी यांच्या सोबत छेडछाड प्रसंग उदभवत होते.याच सर्व प्रश्नांवर त्वरित उपाय शोधावा दोन खिडक्या करून मुलं व मुलींना वेगळी खिडकी उपलब्ध करून द्यावी,रांगेत विद्यार्थी असे पर्यंत खिडकी बंद करू नये,अतिरिक्त कर्मचारी नेमून विद्यार्थ्यांना सहकार्य करावे व काही हि अडचण असल्यास डेपो मॅनेजर यांनी स्वतः लक्ष घालून त्वरीत प्रश्न सोडवावा विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ नये या सर्व मागण्यांसाठी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद तर्फे डेपो मॅनेजर वाणी साहेब यांना घेराव घालण्यात आला. व जागीच सर्व समस्येवर उत्तर शोधून सहकार्याची भूमिका घ्यावी ह्या विनंती सह निवेदन देण्यात आले. यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद चे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष तेजस पाटील, तालुका अध्यक्ष योगेश पाटील,संघटक आकाश पाटील, शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, जिल्हा संघटक पंकज रेणुके, जिल्हा उपाध्यक्ष सचिन माळी, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष दीपक पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, तालुका अध्यक्ष जीभाऊ पाटील, शहर कार्याध्यक्ष मुकेश तुपे व डेपो मधील सर्व पासधारक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न जागीच वि. भ. वि. प. ने दूर करून पास संदर्भात कुठलीही गैरसोय यापुढे होणार नाही ही ग्वाही परिवहन विभागाकडून वाणी व इतर कर्मचारी यांच्या कडून घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.