महापालिकेला ३० कोटी १८ लाख ८२ हजार ८०० रुपयांचा निधी मंजूर

0

जळगाव ;- जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०२३-२४ चा ३० कोटी १८ लाख ८२ हजार ८०० रुपयांचा निधी महापालिकेला मंजूर झाला आहे. हा निधी मनपाचा हक्काचा निधी असून हा निधी सर्व नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये विकास कामांसाठी समान वाटप करण्यात यावा, अश्या सुचना शहर अभियंता व आयुक्तांना करण्यात आल्या असून नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागातील कामांचे प्रस्तीव येत्या दोन ते दिन दिवसात महापौर कार्यालयात सादर करावे, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली.

जिल्हा वार्षिक योजना सन २०२३ २४ ८८ लख ७० हजार ८००, नागरी दलितेत्तरअंतर्गत जळगाव महापालिकेला एकुण ३०कोटी १८ लाख ८२ हजार ८०० रुपयांचानिधी प्राप्त झाला आहे. या मध्ये महाराष्ट्रसुवर्ण जयंती नगरोत्थान योजना-९ कोटीवस्ती सुधार योजना-५ कोटी ३६ लक्ष १२ हजार, नागरी दलित वस्ती सुधार योजना -१४ कोटी ९४ लाख रूपयांच्या निधीचा सामावेश आहे. या निधीपैकी दलित वस्ती सुधार योजनेचा निधी हा फक्त दलित वस्तीच्या प्रभागांमधीलच कामांवर खर्च केला जाणार आहे. शहरात दलित वस्ती अंतर्गत पाच प्रभागत येतात त्यामध्ये प्रभाग क्रमांक १,३,४,१०,१३ आदी प्रभागांचा योजनेतून सामावेश आहे.

 

दलित वस्तीमधील नगरसेवकास ७४ लक्ष

शहरात दलित वस्ती अंतर्गत पाच प्रभागत येतात त्यामध्ये प्रभाग क्रमांक १,३,४,१०,१३ आदी प्रभागांचा सामावेश आहे. या प्रभागांमधील २० नगरसेवकांना प्रत्येकी ७४ लाख प्रमाणे निधीची कामे दिली जाणार आहेत. तर, दलितेत्तर वस्ती सुधार योजना व नगरोत्थान योजनेतून प्रत्येक नगरसेवकांना ३० लक्ष रूपयांचा निधी देण्यात येणार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.