मनोज लोहार, धीरज येवले यांना जन्मठेप

0

जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य डॉ. उत्तमराव महाजन खंडणीप्रकरणी न्यायालयाने सुनावली शिक्षा
जळगाव –

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक मनोज लोहार आणि त्यांचा साथीदार धीरज येवले यांना शनिवारी न्यायालयाने जन्मठेप सुनावली. याप्रकरणी न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात कामकाज झाले.
बुधवारी न्यायालयात झालेल्या कामकाजप्रसंगी लोहार व येवले यांना न्यायालयाने दोषी ठरविले होते, तर अन्य एक संशयित विश्वास निंबाळकर याला दोषमुक्त करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांच्याविरुध्द आलेल्या तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल न करणे, तसेच संस्थेतील गैरकारभार बाहेर येऊ न देण्यासाठी मनोज लोहार यांनी तत्कालीन उपनिरीक्षक विश्वासराव पाटील व धीरज येवले यांच्या माध्यमातून डॉ. महाजन यांच्याकडे 60 लाख रुपये खंडणी मागितली होती. तडजोडीअंती 25 लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. खंडणी दिली नाही म्हणून लोहार यांनी डॉ. महाजन यांना 30 जून 2009 रोजी डांबून ठेवले आणि दुसर्‍या दिवशी 1 जुलै रोजी दुपारी सुटका केली. यानंतर 16 जुलै 2009 रोजी मनोज लोहार, विश्वास निंबाळकर व धीरज येवले या तिघांविरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.