दुष्काळ निवारणासह सर्वच आघाडयांवर सरकार अपयशी-अजित पवार

0

दुष्काळ निवारणासह सर्वच आघाडयांवर सरकार अपयशी
पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण मंजुर नसतांन 67 टक्के कसे देणार-अजित पवार
जळगांव.दि.19- तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या काळात बंदी घालण्यात आलेले डान्सबार केंद्र व राज्य शासनाने बार मालकांशी मखलाशी करून पुन्हा सुरू केले असून विद्यमान सरकार न्यायालयाच्या निर्णयाची ढाल पुढे करून वेळ मारून नेत आहेत. दुष्काळाने होरपळत असतांना शेतकरी आत्महत्या उपाययोजनांसह सरकारी मदत,बेरोजगारी आदी बाबतीत कोणतेच निर्णयांची अंमलबजावणी होत नसून सर्वच आघाडयांवर अपयशी ठरले आहे. या सकारच्या विरूद्ध जनतेत असंतोष निर्माण झाला असून जनतेत जागृती आणण्यासाठी परीवर्तन यात्रा काढण्यात येत आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत केले,
पुढे बोलतांन ते म्हणाले कि, आगामी काही दिवसांतच लोेकसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असून समविचारी पक्षांनी एकत्रितपणे या निवडणूकांना सामोरे म्हणून खान्देशातुन परीवर्तन यात्रा काढण्यात येत आहे. हि विदर्भ मराठवाडा, भागात हि यात्रा जाणार आहे. या सरकारच्या कामकाजा बाबत जनतेत तीव्र असंतोष असून आम्ही सत्तेत असतांना अर्थमंत्रालयाचे बारकावे माहित होते. तिजोरीत पैसा नसतांना निवडणूकांच्या तोंडावर सर्वच वेगवेगळया महामंडळांना 750 कोटींच्या निधीची खिरापत वाटप करीत आहेत.पुरवण्या मागण्या मांंडल्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतरच मान्यता देण्यात येते. व आर्थिेक वर्ष संपत असून नविन वर्षात हे सांगणे म्हणजे निव्वळ धुळफेक आहे. वडार, रामोशी, अन्य समाज मेळाव्यात आश्वासने दिलीत परंतु ती पुर्ण झालेली नाहित.
48 पैकी 44 जागांवर सहमती
समविचारी पक्षांनी एकत्र येवून निवडणूकांना सामोरे जावे असे सर्वोच्च नेत्यांनी ठरविले आहे. त्यानुसार स्थानिक राज्यपातळीवर प्रांत. विभाग, जिल्हा पातळीवर एकजुट होण्याचे मान्य केले आहे. प्रकाश आंबेडकरांशी देखिल बोलणे सुरू आहे. केवळ मतविभागणी होउ नये म्हणून चाचपणी देखिल सुरू आहे. 48 जागांच वाटप होत नाही तोपर्यंत कोणत्याही पक्षाला जाहिर करतायेत नााही. कोण इच्छुक आहेत याची चाचपणी सुरू आहे. काही भागात जागा वाटप तिढा असेल तेथे कार्यकत्यार्ंचे म्हणणे ऐकुन विचार सहमती केली जाणार आहे.
आघाडी न झाल्यास स्वबळावर लढणार यावर अजित पवार म्हणाले आघाडी तर होणारच प्रत्येक प्रांताचे राजकारण वेगवेगळे आहे. त्यानुसार सर्व ठिकाणी योग्य उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जाईल. केवळ औरंगाबाद,जालना,रत्नागीरी, सिंधुदुर्ग या चार ठिकाणचा जागा वाटप प्रश्न चर्चाव्दारे सोडविला जाईल.
पक्षाकडे अनेक इच्छुक उमेदवार आहेत
पक्षाकडे अनेक इच्छुक उमेदवार असून ज्या व्यक्तींची सामाजिक बैठक, चांगली आहे राजकाणाशी संबंध नाहि. परंतु वैचारी सामाजिक पार्श्वभुमी चांगली अहे. विविध घटकांचे प्रतिनिधीत्व दिले जाते. अशा व्यक्ति राष्ट्रवादीच्या संपकार्ंत आहेत. अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांचेशी संपर्कात आहेत असे विचारले असता सामाजिक वैचारीक प्रतिनिधीत्व करणार्‍यांचा जरूर विचार केला जाईल.
नाथाभाउंचा स्वाभीमान जागा व्हावा अशी अपेक्षा
नाथाभाउंवर अन्याय झाला आहे असे त्यांना वाटत असेल, त्यांना डावलेले जात असेल तर त्यांचा स्वाभीमान जागा व्हावा अशी अपेक्षा आहे परंतु तसे काहिही दिसत नाही.असे देखिल अजित पवार यांनी म्हटले. केंद्र व राज्य सरकार हे भारतीय राज्य घटनेच्या व परंपरांच विरूद्ध दिशेने चालत आहे. दलित, मुस्लिम वा अन्य धर्मियांवर अन्याय सर्वदूर होतांना दिसून येत आहे. आम्ही भारतीय आहोत हे सत्ताधार्‍यांना सांगावे लागते याची लाज बाळगा असा मार्मीक टोला आ.छगन भुजबळ यांनी यावेळी बोलतांना दिला. राज्यघटनेनुसार न्यायालयाने केवळ 50 टक्के आरक्षण मर्यादा घालुन दिलेली असतांना महाराष्ट्रात 67 टक्के आरक्षण न्यायालयात कसे टिकणार यासाठी विधीतज्ञांची मजबूत फळी उभी करून आरक्षण कसे टिकेल हे पाहिले पाहीजे. तामीळनाडू राज्यात 50 टक्क्यांच्या वर आरक्षण आहे हा निर्णय कोर्टात प्रलंबित आहे त्यांचा निर्णय लागलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह केंद्राने दिलेले 10 टक्के आरक्षण टिकेल कि नाहि हे पाहणे उचित ठरेल. डान्सबारचा निर्णयासह विद्यमान राज्य सरकार नेहमीच न्यायालयाच्या निर्णयाची ढाल पुढे करून वेळ मारून कातडीबचावाचे धोरणाचा अवलंब करीत वेळ मारून नेत आहे असे देखिल त्यांनी सांगीतले.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी उपमुख्यमंऋी छगन भुजबळ, विधानपरीषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष आ.दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री फौजीया खान, माजी मंत्री जयंत पाटील,अनिल पाटील, कल्पना पाटील, यांचेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.