भुसावळ पालिकेच्या सभेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये जुंपली

0

भुसावळ | प्रतिनिधी

भुसावळ नगरपालिकेमध्ये आज आयोजित बुधवार ४ रोजी आयोजित सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी ५२ विषयांना मंजूरी देऊन अवघ्या  दोन मिनिटात सभा  गुंडाळल्याने विरोधी गटाचे गटनेते यांच्यासह नगरसेवक कमालीचे  संतप्त झाल्याने सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक होत तुतू- मैं मैं झाल्याने काही काळ तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली .दरम्यान   प्रसंगानुसार भान राखत परिस्थिती नियंत्रणात आली .
जनआधार आघाडीचे गटनेता उल्हास पगारे व नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी शहरात कोणत्याही प्रकारच्या सुविधा नागरिकांना नाही मग त्यांनी कर का भरावा ,यासह विविध मुद्दे उपस्थित करीत  रूद्रावतार धारण करून सत्ताधार्‍यांना  याबाबत जाब विचारला  . यामुळे दोन्ही गटांमध्ये तू तू मैं मैं होत शाब्दीक चकमक उडाली.
भुसावळ पालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती . यावेळी   नगराध्यक्ष रमण भोळे, गटनेते हाजी मुन्ना तेली ,मुख्याधिकारी सौ करुणा डहाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते . विषयांचे वाचन संजय बाणायते  यांनी केले .वाचन सुरु असतानांच जनाधार चे दुर्गेश ठाकुर व उल्हास पगारे यांनी दीनदयाल नगर व रेल्वे भागातील  बेघर लोकांना घरे नाही त्यांना पर्यायी जागा नाही , पुनर्वसन नाही , शहरात स्वच्छता नाही , सर्वत्र दुर्गंधि याबाबत नगराध्यक्ष यांना जाब विचारताच एकच गोंधळ झाला व अवघ्या काही क्षणात सर्व  सत्ताधारी नगरसेवकांनी अजेंड्यावरील सर्व 52 विषयास सर्वानुमाते मंजूरी देत नगराध्यक्ष यांनी सभा आटोपली. यावेळी विरोधक व सत्ताधारी कमालीचे आक्रमक झाले त्यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली .
जनाधार पार्टिचे गटनेते दुर्गेश ठाकुर यांनी ” कोणी या गरीबाला घर देता का घर ” अश्या आशयाचा दोन्ही बाजूला  मजकूर असलेले जाकिट  स्वरूप बँनर  परिधान करून सभागृहाचे लक्ष वेधले . दिनदयाल नगर मधील गोरगरीबांचे पुर्नवसन करण्याबाबत दिले निवेदन    दिनदयाल नगर भागामधील नागरीकांचे रहिवासांचे घरे महामार्गाच्या विस्ताकरणाच्या दरम्यान काढण्यात आले त्याबाबत त्यांना तुटपुंजे मोबदला शासनाकडून देण्यात आला. या नगरमधील नागरीक हे अंदाजे चाळीस पन्नास वर्षापासून तेथे वास्तव्यास होते. तसेच सदरचे नागरीक हे नियमितपणे नगरपालिकेचे कर अदा करत होते. अशी परिस्थिती असतांना त्यांना अचानकपणे बेघर करण्यात आले. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीकोनातून त्या लोकांचे पुर्नवसन करून त्यांना मदतीचा हात देणे हे नगरपालिकेचे आदय कर्तव्य आहे एकीकडे केंद्र व राज्य सरकार सर्वासाठी हक्कांची घरे उपलब्ध करून देत असून भुसावळ नगरपालिका मात्र या लो  कांकडे उपेक्षेच्या भावनेने पाहात आहे असे चित्र निर्माण झाले आहे . हे नागरिक गोरगरीब असल्यामुळे ते त्यांच्या हक्कांचा निवारा करण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांना नगरपालिकेच्या हक्कांच्या जागेवर पुर्नवसन करण्यात यावे जेणे करून त्यांची घरासाठी होत असलेली भेटकती थांबेल व त्यांना न्याय मिळेल.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . सदर निवेदन नगरसेवक दुर्गेश ठाकुर यांनी नगराध्यक्ष रमण भोळे यांना यावेळी दिले.  सभेस युवराज लोणारी , प्रा दिनेश राठी , मनोज बियाणी , सुनील नेवे , पिंटू ठाकुर , किरण कोलते , रविन्द्र सपकाळे , लक्ष्मी मकासरे , सविता मकासरे , पूजा सूर्यवंशी , अँड. बोधराज चौधरी , यांचेसह विरोधक दुर्गेश ठाकुर , उल्हास पगारे , कविता चौधरी ,शेख शकील शे सत्तार ,आशिख शेख ,  यांचेसह नगरसेवक उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.