अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणास अटक

0

चाळीसगाव | प्रतिनिधी

येथील अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पुणे येथे पळवून नेणाऱ्या पुणतांबा येथील तरुणास मुलीसह तीन वर्षानंतर पुणे येथून ताब्यात घेतले आहे. दोघे प्रेमी युगल शहर पोलीसांच्या ताब्यात आहेत.
या घटनेची माहिती अशी की, येथील डेराबर्डी भागातील साडे सतरा वर्षीय मुलीस दि.25/7/2017 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास आरोपी कुणाल साठे रा.पुणतांबा ता. राहता जि. नगर  याने लग्नाचे अमिष दाखवून पूणे येथे पळवून नेले. तेथे या दोघांनी लग्न केले. पीडित तरुणीला पळवून नेल्याप्रकरणी तिच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुरनं.102/2017 भादंवि कलम 363, 366 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा शहर पोलीस तपास करीत असतांना सदर आरोपी हा पुणे येथे असल्याची गोपनिय माहिती मिळाली असता पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव, पोकॉ राहुल गुंजाळ, सुनील राजपुत, योगेश जाधव, महिला पोकॉ सबा शेख यांच्या पथकाने पुणे येथे जावून आरोपी कुणाल साठे व पीडित तरुणीस दि.3 मार्च रोजी पुणे आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ओटास्कीम, भागातून ताब्यात घेतले. आरोपी साठे हा पुणे येथे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता असे तपासात आढळून आले आहे.तब्बल तीन वर्षानंतर अल्पयवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेणारा आरोपी पोलीसांच्या हाती लागला आहे. आरोपीसह पीडित तरुणीला चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.