भुसावळात रेल्वे कर्मचारी अन् जळगावात अंगणवाडी सेविकांचा देशव्यापी संपाच्या समर्थनार्थ मोर्चा!

0

भुसावळ/ जळगाव दि. 7-
सरकारच्या कामगार विरोधी धोरण्याच्या निषेधार्थ दि. 8 व 9 जानेवारी रोजी होणार्‍या देशव्यापी संपाच्या समर्थनार्थ आज भुसावळात सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघाच्या वतीने मंडल रेल प्रबंधक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तर जळगाव येथे अंगणवाडी कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचा जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्यात आला.
देशातील असंघटीत क्षेत्रातील कामगार व कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत व मध्यवर्ती सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरुद्ध दि. 8 व 9 रोजी देशव्यापी संप त्याचप्रमाणे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दि. 7 रोजी अंगणवाडी व आशा स्वयंसेविकांनी जिल्हा परिषदेसमोर राज्याच्या अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील व युवराज बैसाणे यांच्या नेतृत्वात ठिय्या करण्यात आला.
असंघटीत क्षेत्रात कार्यरत कर्मचार्‍यांबाबत 45 व 46 व्या कामगार परिषदेत मंजूर झालेल्या शिफारशी अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना विनाविलंब लागू करा, 18 हजार वेतन द्या, असंघटीत क्षेत्रातील कामगारांना दरमहा 6 हजार रुपये पेन्शन व सामाजिक सुरक्षा लागू करा, अंगणवाडी कर्मचार्‍यांना साडेचार तासांऐवजी आठ तास पूर्ण वेळ काम देवून त्यांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन लागू करा यासह 19 मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविकांनी कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील व युवराज बैसाणे यांच्या नेतृत्वात शिवतीर्थ येथून दुपारी 1 वा. जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात येवून जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्या व संपाचा इशारा देण्यासाठी ठिय्या केला. यावेळी प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला सादर करण्यात आले.
यशस्वीतेसाठी मिनाक्षी चौधरी, मंगला नेवे, चेतना गवळी, सविता महाजन, पुष्पा परदेशी, संगिता निंभोरे, शकुंतला चौधरी, रेखा नेरकर, रमा अहिरे, सुनंदा नेरकर, उज्वला पाटील, कल्पना भोई, भागिरथी पाटील, आशा पोहेकर, साधना पाटील, बेबी पाटील, शोभा जावरे, कुर्शाद तडवी, सरला पाटील आशा जाधव, रत्ना सोनवणे, आक्का सपकाळे, वंदना कंखरे, नंदा देवरे, सुनिता नेतकर, सुरेखा पाटील शुभांगी बोरसे, सविता वाघ, ज्योती पाटील, सुलोचना पाटील, सुरेखा मोरे, मिना गढरी आदींनी परिश्रम घेतले.
या आहेत प्रलंबित मागण्या
45 व 46 व्या कामगार परिषदेत मंजूर शिफारशी विनाविलंब लागू करा, अंगणवाडी कर्मचारी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दरमहा 18 हजार वेतन द्या, असंघटीत कामगारांना 6 हजार पेन्शन द्या, पंतप्रधानांच्या घोषणेनुसार दरमहा मानधनात वाढ, कर्मचार्‍यांचे साडेचार कामांच्या तासाऐवजी आठ तास काम देवून वेतन व भत्ते लागू करा, 25 पेक्षा कमी लाभार्थी अंगणवाडीचे समायोजन करु नये, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा, दरमहा मानधनात 20 टक्के मानधन वाढ द्या, त्यांना अनुकंपा तत्व लागू करा, महिला कर्मचार्‍यांना इतरांप्रमाणे बाल संगोपनाची भर पगारी रजा द्यावी, सेवानिवृत्तीनंतर श्रावणबाळ पेन्शन योजना, ज्येष्ट नागरीक पेन्शन योजना लागू करा, आजारपणाची रजा द्या, प्रत्येकी एक महिना उन्हाळी सुटी द्या, मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडीत रुपांतर करा, नागरी विभागातील अंगणवाडी केंद्राचे सुधारीत भाड्याचे दर विनाविलंब लागू करा,सेवा समाप्तीच्या रक्कमेत अंगणवाडी सेविका 3 लाख, मदतनीस 2 लाख, मिनी अंगणवाडी सेविका 2 लाख तसेच सेवानिवृत्ती लाभ लागू करावा, तिसर्‍या अपत्याबाबत सुधारित आदेश काढून दि. 1 डिसेंबर 2018 नंतरच्या काळासाठी तो सक्तीने लागू करा भाऊबीज भेट देण्यात यावी आदी मागण्या आहेत.
सीआरएमएसतर्फे डिआरएम
कार्यालयावर मोर्चा
भुसावळ : सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात सर्व केंद्रीय ट्रेड युनियन, फैडरेशन व असोसिएशनद्वारा 8 व 9 रोजी होणार्‍या देशव्यापी संपाला समर्थन देण्याकरीता दि. 7 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन ते मंडल रेल प्रबंधक कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात सीआरएमएसच्या कामगारांनी सहभाग घेत सरकार व रेल्वे प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत विरोध व रोष व्यक्त केला. यानंतर मोर्चाचे रुपांतर द्वारसभेत झाले. द्वारसभेला मंडळाध्यक्ष व्ही. के. समाधिया, झोनल सचिव पी. एन. नारखेडे, मंडळ सचिव एस. बी. पाटील, एस. एस. चौधरी, ए. के. तिवारी, मेघराज तल्लारे आदींनी संबोधीत केले. अभय आखाडे, किशोर कोलते, गणेशसिंह, ए. एस. राजपूत, सुंदरम झा, चुन्नीलाल गुप्ता, नंदकिशोर उपाध्याय, हरीचंद सरोदे, चिखलकर, भुषण सोनार, स्वप्नील पाटील आदी पदाधिकार्‍यांनी मोर्चा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.