जागर स्त्री शक्तीचा सन्मान फुले दाम्पत्यांचा उपक्रम साजरा

0

 

भुसावळ दि . 7 –
क्रांन्तीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 188 वी जयंती निमित्त येथील राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाउंडेशनतर्फे जागर स्त्री शक्तीचा सन्मान फुले दाम्पत्यांचा उपक्रम साजरा करण्यात आला . या अभिवादन कार्यक्रमास भुसावळ करांकडुन एक वही व पेन या आवाहनाला गरजवंतांना मदतीचा हात देण्यासाठी चांगला प्रतीसाद मिळाला .
कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिक्षक .गजानन राठोड यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून बाजारपेठ पोलीस निरीक्षक देविदास पवार , तालुका पोलीस ठाणे निरीक्षक रामकृष्ण कुंभार,महिला समुपदेशन केंन्द्र सौ.शितल अव्हाड- जावरे, सौ.भारती रंधे- म्हस्के ,अष्टभुजा जेष्ठ नागरिक संघ उपाध्यक्ष वैद्य रघुनाथ अप्पा सोनवणे , आदी मान्यवर उपस्थित होते . सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संजय सावकारे ,उपविभागीय पोलीस अधीक्षक गजानन राठोड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्त्कार फाउंडेशन अध्यक्षा राजेश्री सुरवाडे यांनी केले . सावित्रीबाई जयंती निमित्त राबविण्यात आलेला शैक्षणिक उपक्रम – 1 वहि व 1 पेन अभिवादन स्वरूपी फाउंडेशन ला मदत देण्यात यावी या उपक्रमास शहरातून उपस्थित मान्यवरांसह वाहतूक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले,पो कॉ शालीनी वल्के नगरसेवक नितीन धांडे, शिशिर जावळे अध्यक्ष- साई निर्मल फाउंडेशन अरूणा सुरवाडे ( नगरसेविका ,)राजेंन्द्र चौधरी ( माजी सभापती पंचायत समिती ), .पिंटु कोठारी ( नगरसेवक राजेंन्द्र आवटे (माजी. नगरसेवक तथा अध्यक्ष- शंभुराजे गृप गडकरी नगर भुसावळ),.अ‍ॅड. राजेश झाल्टे सर, मा.आनंद ठाकरे ( माजी सरपंच साकेगाव), डॉ.सुवर्णा गाडेकर (अर्पणा हॉस्पीटल भुसावळ),डॉ.दिपक पाटील,मुकेश गुंजाळ नगरसेवक मिलींद कापडे शिवसेना पदाधीकारी, .नरेंन्द्र यादव( समाजिक कार्यकर्ता), रिना साळवी ( मनसे शहर अध्यक्ष), ,सुमंगल आहिरे सर ,प्रविण पाटिल, कपिल पहरकर, मयुर सुरवाडे, राहुल बि-हाडे, संध्या चंदेल, गणेश परदेसी, श्रीकांत वानखेडे( तापी लाईव्ह न्युज चॅनल ), संदिप घोलप, नम्रता शिंदे, उषा वर्मा , प्रेमकुमार महिरे, भुमिका बोदवडे, प्रविण शर्मा , बौद्ध समाज संघाचे प्रा. सुनिल सुरवाडे, बाळुभाऊ सोनवणे ( अध्यक्ष – करूणा सागर विकास बहुउद्देशिय फाउंडेशन ), मयुर सुरवाडे ….आदिंनी उपक्रमा अंतर्गत अभिवादन स्वरूपी वहि व पेन फाउंडेशन ला भेट देऊन सहकार्य केले तसेच कॉग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदिप पाटील सर, माजी उपनगराध्यक्ष मोहन निकम, प्रदिप नेहते तथा पदाधिकारी यांनीही अभिवादन केले फाउंडेशन ला जवळपास 1 हजार 35 वह्या व 816 पेन, 60 सिसपेन्सील ,50 शॉपनर ,60 रबर… ई. मिळालेली शैक्षणिक साहित्य वही व पेन व ई.साहित्य राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशिय फाउंडेशन भुसावळ फाउंडेशन च्या वतिने गडचिरोली जिल्ह्यातील गरिब, गरजवंत, होतकरू विद्यार्थी यांना शिक्षणासाठी भेट देणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.