येत्या आठ ते दहा दिवसात वाळु उपलब्ध केली जाईल -आ.किशोर पाटील

0

 

पाचोरा दि . 7 –
शिवसेनेचे आ.किशोर पाटील यांनी सोमवार दिनांक 7 जानेवारी 2019 रोजी शासकीय कामे तातडीने पुर्ण व्हावी पण ते कामे वाळुमुळे अर्धवट असल्याने आलेला निधी परत जाण्याची भीती असल्याने जनकल्याणांची विकासकामे व घरकुलसह त्यांच्या मतदारसंघातील मंजुर झालेल्या विकास कामांना असेच परत जाऊ देणार नाही म्हणुन यासंदर्भात वारंवार शासन व प्रशासनाकडे बरीच दिवसापासुन पत्रव्यवहार मागणी व पाठपुरावा वाळु संदर्भात केलेले असतांना देखील शासनाने कोणतेही पाऊले उचलले नसतांना वेळ आणि कालावधी कमी असल्याने ते विकास कामे लवकर पुर्ण व्हावे यासाठी आ.किशोर पाटील यांनी पत्रकार परीषदेत एल्गार पुकारला होता. व जर शासन आणि प्रशासन निर्णय घेत नसेल तर मी स्वतः शिवसैनिकांसह उभे राहुन या विकासकामांना वाळु पुरवेल ? असा कडक इशारा प्रशासनाला दिले होते.आणि 7 जानेवारी पर्यंत आंदोलनाचे अल्टीमेटम दिले होते.
पण वेळीचं प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत शासन स्तरावर चर्चा करून आ.किशोर पाटील यांचे वाळु संदर्भात मागणीचे आंदोलन मागे व्हावे यासाठी जिल्हाअधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी आ.पाटील यांच्याशी तीन ते चार वेळा चर्चा केली व लवकरचं आपली वाळु संदर्भातील मागणी पुर्ण केली जाईल. तरी आपण आंदोलन करू नये अशी विनंती चर्चे दरम्यान व पत्राद्वारे केली.
लवकर फक्त पाचोरा-भडगांव तालुकाचं नव्हे तर संपुर्ण जिल्ह्यातील अपुर्ण पडलेले शासकीय विकास कामांना वाळु उपलब्ध केली जाईल याबाबत निर्णय केला जाईल असं आश्वासन आ.किशोर पाटील यांना लेखी पत्रान्वये मिळाल्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश बापु पाटील यांनी तुर्तास या आंदोलनाला स्थगिती दिलेली असुन शिवसैनिक व युवासैनिक उद्या आंदोलन करणार नाही.जर येत्या आठ ते दहा दिवसात योग्य निर्णयास विलंब झाला तर मग शिवसैनिक जनकल्याणासाठी पुन्हा आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. असे सुचक इशारा उपजिल्हाप्रमुख गणेश पाटील यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.