विज्ञानामुळे जगण्यात डोळसपणा येतो- दीपा देशमुख

0

 

जळगाव दि . 7 –
विज्ञानामुळे जगण्यात डोळसपणा येतो त्या नोबेल फाउंडेशन संध्याकाळी भैय्यासाहेब गंधे सभागृहात आयोजित केलेल्या मजीनियस येती घराफ व्याख्यानात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.कुलगुरू पी पी माहुलीकर , दिपस्तंभ फाउंडेशनचे संचालक प्रा. यजुर्वेद्र महाजन , खान्देश शिक्षण प्रसारक मंडळ अमळनेरचे अध्यक्ष निरज अग्रवाल , निवृत्त शिक्षणाधिकारी निळकंठ, प्रा एस जे पाटील,नोबेल चे संस्थापक जयदीप पाटील ,विशाल पाटील उपस्थित होते.
त्या पुढे बोलतांना म्हणाल्या की, देशाला जिनियस विद्यार्थ्यांची गरज आहे .समाजाला फक्त बुद्धीने जिनियस नाही तर मनाने समृद्ध पिढी आवश्यक आहे. मी काही वर्षांपूर्वी अतिशय दुर्गम आदिवासी भागात शिक्षणाचे काम करत होते. तेव्हा अच्युत गोडबोले यांच्याकडून लिखाणाची प्रेरणा घेतली. त्यांनी माझ्यातील लेखिका शोधून काढली आणि आम्ही लिहीत राहिलो. जीवनात मला काय मिळाले त्यापेक्षा मला काय शिकायला मिळेल हे महत्वाचे आहे. जेव्हा आपण काम करताना शुद्ध काम करतो तेव्हा ते काम उत्तम दर्जाचे असते. मी चित्रकला,संगीत, विज्ञान, तंत्रज्ञान, अश्या विषयांचा अभ्यास केला. पिकासो,लिओनार्दो द विंची, मायकेल अँजेलो या कलाकारांकडे सर्जनशीलपणा होता ,स्वप्नं होतं आणि मेहनतीची तयारी होती. जिनियस लिहिताना मी जगातील महान व्यक्तींचा अभ्यास केला. जिनियस लोक वेगळी नसतात ते अतिशय सामान्य असतात. ते मानवाच्या कल्याणासाठी झटतात आणि संशोधन आणि कल्पकतेवर प्रेम करतात.
जगदीशचंद्र बोस यांनी रेडिओ चा शोध लावला ,वनस्पतींना भावना असतात हा शोध लावला. जगदीशचंद्र बोस यांनी रवींद्रनाथ टागोर यांचे साहित्य इंग्रजीत अनुवादित केले त्यामुळे टागोर नोबेल पारितोषिक पर्यंत पोहचू शकले. जिनियस व्यक्तींना डोळसपणा असतो. ते धाडसी असतात
तंंत्रज्ञ जीनियस पुस्तकाचे प्रकाशन
दरम्यान , महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक अच्यूतराव गोडबोले व दीपा देशमुख लिखीत तत्रज्ञ जीनियस या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दीपा देशमुख यांची विदेशी जीनियस , सिंफनी, कनव्हास, भारतीय जीनियस , सुपरहिरो ही पुस्तके लोकप्रिय आहेत. त्यांनी लिहलेल्या पुस्तकांच्या यादीत मतंत्रज्ञ जीनियस म या पुस्तकाची भर पडली आहे.यावेळी त्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शहरातील इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पीयाड परीक्षेतील अमेय प्रशांत देशमुख व होमीभाभा परीक्षेतील अर्चित पाटील,सूनय पाटील,स्वनित पाटील , सौरभ माळी या गुणवंताचा गौरव करण्यात आला.
दुष्काळी परिस्थितीचे असेही भान , नोबेल फाउंडेशन कडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेवण व एमएचटी सीईटी क्लास विनामूल्य विज्ञान विषयाचा प्रचार – प्रसार व विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी गत चार वर्षांपासून कार्यरत असलेल्या नोबेल फाउंडेशनने महाराष्ट्रात पडलेल्या भिषण दुष्काळाची जाणीव ठेवत , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जेवण व एमएचटी सीईटी चा दोन महिन्यांचा कोर्स विनामुल्य उपलब्ध करून देणार असल्याची माहिती नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. जयदीप पाटील यांनी प्रास्ताविक दरम्यान दिली. दरम्यान प्र. कुलगुरू पी पी माहुलीकर , दिपस्तंभचे संचालक यजुर्वेद्र महाजन , निळकंठ गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले,
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोज पाटील यांनी केले तर विशाल पाटील यांनी आभार मानले.कार्यक्रम प्रसंगी पालक विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.