भुसावळात मोबाईल चोरट्यास अटक

0

भुसावळ | प्रतिनिधी 

मोबाईलसह रोकड हिसकावून पळ काढणा-या चोरट्याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.   ११ जून रोजी दुपारी ५ वाजेच्या सुमारास शहरातील पुरुषोत्तम नगर गायत्री मंदिर बाजूला रोड वरून जात असतांना अज्ञात दोन जणांनी २२,०००/-रु रोख व ६०० रु की चे ६००/-रु की ची मोबाईल हे जबरीने हिसकावून घेत पोबारा केला होता. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग ५ गुरंन ३२९/२०१९ भादंवी कलम-३९२,३४ प्रमाणे दिनांक १२ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान संशयित आरोपी  जितू एकनाथ घावरे (वय-२४,रा.वाल्मिक नगर, भुसावळ ) याने संबंधीत गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला वाल्मिक नगर भागातुन सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. ही  कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्रायय गुलिंग, उपनिरीक्षक मनोज ठाकरे, हेकॉ सुनील जोशी, शंकर पाटील,पो ना किशोर महाजन, विकास सातदिवे,समाधान पाटील समाधान पाटील आदींनी केली असून पुढील तपास पोहेका सुनील जोशी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.