फरार आरोपीला अटक

0

भुसावळ | प्रतिनिधी 

शहरात रजा टॉवर  भागामधून फरार आरोपीस बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. भुसावळ बाजारपेठ पो स्टे भाग 5 गुरंन 0257/2019 पोस्को कलम-12 सह भादवी कलम-452,506 प्रमाणे दिनांक 29 एप्रिल 2019  रोजी  गुन्हा दाखल आहे. यातील फरार आरोपी  शेख शोहेब शेख अकिल वय-20 रा.पापा नगर भुसावळ याची  पोलीस निरिक्षक  देविदास पवार  याना गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की यातील आरोपी हा  शहरात रजा टॉवर  भागात आल्याची बातमी वरून त्यास सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे.   ही कार्यवाही  पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले अप्पर पोलीस अधीक्षक  लोहित मतानी ,तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी  गजानन राठोड,  पोलीस निरीक्षक  देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस  उपनिरीक्षक  दत्रायय गुलिंग, पो हे का सुनील जोशी, पो ना किशोर महाजन, पो का विकास सातदिवे, समाधान पाटील यांनी  केली असून अधिक तपास पोलिस उप निरीक्षक दत्रायय गुलिंग करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.