भुसावळचे निलंबीत तलाठी एन.आर.ठाकूर सेवेतून बडतर्फ

0

भुसावळ | प्रतिनिधी
     येथील भुसावळ शहराचे सध्या  निलंबीत असलेले तलाठी नरेंद्र राजेंद्र(एन.आर)ठाकूर यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचे आदेश भुसावळचे उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर दिल्याने महसुल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
भुसावळ शहर व सातारे गाव या दोन्ही सजांमध्ये तलाठी म्हणून काम केलेले नरेंद्र राजेंद्र ठाकूर यांना गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे निलंबीत करण्यात आले होते.निलंबनाच्या कार्यकाळात त्यांना मुक्ताईनगर येथील तहसिल कार्यालयात हजेरी देण्याचे बंधनकारक करण्यात आले होते.दरम्यान, त्यांच्या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर  उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी त्यांना शासकीय सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्याचे आदेश दि.१२ रोजी दिले आहेत. याची प्रत नरेंद्र ठाकूर यांना देण्यात आली आहे. प्रांताधिकार्‍यांच्या या निर्णयामुळे महसूल क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.