भुमी अभिलेख कार्यालयात कायमस्वरूपी उपअधीक्षकांची मागणी

0

बोदवड – येथील भुमी अभिलेख कार्यालयात कायमस्वरूपी उप अधीक्षक मिळावेत अशी मागणी बोदवडकरांनी जिल्हा भुमी अभिलेख अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बोदवड येथील भुमी अभिलेख कार्यालयात गेल्या चार वर्षांपासून कायमस्वरूपी उप अधीक्षक नसून हा कारभार प्रभारी म्हणून अधिकारी पाहत आहेत तर आजरोजी प्रभारी म्हणून श्री. सोनवणे हे पदभार सांभाळत आहेत. त्यामुळे बोदवड येथील भुमी अभिलेख कार्यालयात गेल्या चार वर्षांपासून कायमस्वरूपी उप अधीक्षक नसल्याची वस्तुस्थिती आहे.सन 2015 मध्ये जी.डब्लु.गायकवाड हे कायमस्वरूपी उप अधीक्षक म्हणून कार्यरत होते.

ते सेवानिवृत्त झाले तेव्हा पासून हा कारभार प्रभारी अधिकारी पाहत आहेत.तर बोदवडकरांना कायमस्वरूपी उप अधीक्षक मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यातही प्रभारी कार्यभार सांभाळणारे उप अधीक्षक श्री.सोनवणे हे सतत गैरहजर राहत असल्यामुळे येथे कामानिमित्त येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे.
ही बाब लक्षात घेऊन बोदवड येथील भुमी अभिलेख कार्यालयात कायमस्वरूपी उप अधीक्षक मिळावा अशी मागणी येथील नागरिकांनी जिल्हा भुमी अभिलेख अधिक्षक यांच्याकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनावर विनोद गणपत मायकर, भागवत रघुनाथ वंजारी, दिनेश काशिनाथ वंजारी, योगेश उत्तर बडगुजर यांसह बोदवड येथील नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.