फिट इंडिया मूहमेंट क्रिडा सप्ताहाचे उत्साहात उद्घाटन

0

अमळनेर  प्रतिनिधी

येथील धनदाई एज्युकेशन सोसायटी संचलित शांती निकेतन प्राथमिक व जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात क्रिडा सप्ताह फिट इंडिया मूहमेंटचे आयोजन करण्यात आले.

शालेय जीवनात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यायामाचे धडे मिळण्याकरिता केंद्र शासनाने दिनांक 12डिसेंबर 18 डिसेंबर  या कालावधीत ही मोहीम राबविण्याचे सूचित केले असून त्याअनुषंगाने शालेय स्तरावर अंमलबजावणी होत आहे.

क्रीडा संस्कृती जोपासली जावी त्याला पोषक वातावरण निर्माण व्हावे याकरिता 12 डिसेंबर ते 18डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत त्याअनुषंगाने विविध खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन धनदाई कला महाविद्यालयाचे चेअरमन आबासो.व.ता.  पाटील व संस्थेचे अध्यक्ष नानासो डी.डी. पाटील यांनी केले. याप्रसंगी आबासाहेब म्हणाले की,शरीरसंपत्ती हीच खरी संपत्ती आहे निरोगी जीवन जगण्यासाठी शरीर मजबूत राहण्यासाठी व्यायाम करणे हे महत्त्वाचे आहे. तसेच आज 12 डिसेंबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सशक्त शरीर व निरोगी आयुष्य ठेवा निरोगी जीवन जगा असे आवाहन देखील याप्रसंगी विद्यार्थ्यांना  केले.

यावेळी धनदाई एज्युकेशन सोसायटीचे  अध्यक्ष नानासाहेब म्हणाले,  सशक्त शरीर सशक्त मन हे चांगले जीवन जगण्याचे लक्षण आहे देश म्हणजे देशात राहणारी जनता भारत देशा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो येथील तरुण फिट मजबूत असेल तर भारत देश मजबूत अर्थातच महान होईल एक दिवस व्यायाम करून शरीर मजबूत होत नाही तर नियमित व्यायामाची सवय झाली पाहिजे. 12 डिसेंबर ते 18डिसेंबर दरम्यान, विविध खेळात मनोरंजन  खेळ, पारंपारिक खेळ, मैदानी खेळ, संगीत खुर्ची, चित्रकला स्पर्धा अशा नावीन्यपूर्ण स्पर्धा व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात देखील करण्यात आले आहे. याप्रसंगी योगासने याविषयी माहिती यशवंत सूर्यवंशी सर यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.