गालापूर वस्ती शाळेत क्रीडा सप्ताहाचे आयोजन

0

निपाणे, ता.एरंडोल  वार्ताहर

महाराष्ट्र राज्यात सर्वत्र दिनांक 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर फिट इंडिया मोहीम अंतर्गत महाराष्ट्र शासन तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे द्वारा प्राप्त सूचनेनुसार क्रीडा सप्ताह आजपासून सुरू करण्यात आला असून एरंडोल तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिल्ल वस्ती गालापुर याठिकाणी शाळा अंतर्गत छोट्या बालगोपाळांसाठी  क्रीडा स्पर्धांना आज प्रारंभ करण्यात आला.

यावेळी सुनिल लक्ष्मण भिल, सुभाष दादा भील ,नरोत्तम दादा भिल,  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश भिल शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक आणि शाळेचे मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर उपस्थित होते. यावेळी बोलताना किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की 29 ऑगस्ट 2019 रोजी फिट इंडिया चळवळीचा प्रारंभ देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या शुभहस्ते झालेला आहे.राज्यात सर्वत्र खेळाचे वातावरण तयार व्हावे खिलाडूवृत्ती वाढावी तसेच सर्वांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी ही मोहीम अत्यंत उपयुक्त असून राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे क्रीडा सप्ताहास 12 डिसेंबर आजपासून राज्यभर प्रारंभ होत आहे.खेळामुळे मन प्रसन्न  होते प्रसन्न मनामुळे आरोग्य सुदृढ राहते सर्वांचे आरोग्य सुदृढ आणि तंदुरुस्त राहण्यासाठी सर्वांनी विविध खेळांची कास धरण्याचे आवाहन देखील या निमित्ताने त्यांनी उद्घाटक म्हणून केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूनील  भिल होते. लिंबू चमचा स्पर्धा घेण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.