भाजपाच्‍या जुन्या निष्ठावंतांना तिकीट द्यावे !

0

निवडणुक लढण्‍याची माझी तयारी

-भाजपाचे नगरसेवक व माजी गटनेता राजेंद्र चौधरी यांची पत्रकार परिषदेत माहिती

चाळीसगाव (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीचा मी जवळपास १९८४ पासुन कार्यकर्ता आहे. आजपर्यंतच्‍या काळात भाजपाच्‍यावतीने करण्‍यात आलेल्‍या विविध आंदोलनात सहभाग घेवुन नगरपालीकेत विरोधी पक्षनेता, गटनेता, जिल्‍हा नियोजन समिती सदस्‍य यासह अनेक विविध पदे भुषविले आहेत.  ज्या काळात भाजपाला अपयश येत होते, त्यावेळेस आम्ही  पक्षाशी एकनिष्‍ठ राहुन काम केले. वेळेप्रसंगी आंदोलने केली, आमच्या वर  केसेस दाखल केल्या, आर्थिक नुकसान झाले,आज भारतीय जनता पक्षाला चांगले दिवस आले असताना प्रामाणिक पणे काम करणारा कार्यकर्ता वंचित राहत आहे, यामुळे होवू घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाच्‍या तिकीटावर विधानसभेची निवडणुक लढविण्याची माझी तयारी असुन तसा अर्जही सादर केल्‍याची माहिती नगरसेवक तथा पालीकेचे भाजपाचे माजी गटनेते राजेंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.  चाळीसगाव शहरातील भाजपाच्‍या कार्यालयात रविवारी रोजी घेण्यात आलेल्‍या पत्रकार परिषदेप्रसंगी भाजपाचे जेष्‍ठ नेते प्रितमदास रावलानी, योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे,  माजी जिल्‍हा परिषद सदस्‍य राजेंद्र राठोड, बाजार समिती सभापती रविंद्र पाटील, किसान मोर्चाचे कैलास सुर्यवंशी, नगरसेवक सुरेश स्‍वार,प्रेमचंद खिवंसरा, चंद्रकांत तायडे, राजेंद्र मांडे, संजय चौधरी, गौरव चौधरी, विवेक चौधरी आदींची उपस्‍थिती होती. चाळीस वर्षांपासुन आम्‍ही भाजपाचे एकनिष्‍ठपणे काम करीत असुन आज भाजपाला निवडणुकीत आलेले यश हे त्‍याची पावती आहे. यामुळे माझ्‍यासह जुने पदाधिकारी असलेले कैलास सुर्यवंशी, सुरेश स्‍वार, बाजार समितीचे सभापती रविंद्र पाटील, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राठोड, हे देखील भाजपाच्‍या तिकीटावर निवडणुक लढविण्‍यासाठी इच्‍छुक असल्‍याचे राजेंद्र चौधरी यांनी सांगीतले.  शेवटी राजेंद्र चौधरी यांनी सांगितले की उमेदवारी मिळवण्यासाठी आम्ही वरीष्टांशी शेवटच्या क्षणापर्यंत आमची भूमिका मांडू, शेवटी पक्षाने ज्याला उमेदवारी दिली त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असेही सांगितले,

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषदेत असल्याने ,पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना डॉ संजीव पाटील म्हणाले की, माझ्या कडे आलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या भावना वरिष्ठांना सादर करण्यात येतील,त्याच बरोबर गिरणा  फाउंडेशन च्या माध्यमातून माझे भडगाव, पाचोरा आणि विशेषतः चाळीसगाव मध्ये चांगले काम आहे,मी पण पक्षाकडे विधानसभे साठी मागणी करणार असल्याचे सांगितले,

Leave A Reply

Your email address will not be published.