“एक हात मदतीचा” माध्यमातून पुरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरु

0

माजी आमदार राजीव देशमुख यांच्या आव्हानाला तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद

चाळीसगाव- गेल्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पाण्याने हाहाकार माजवला असून पश्चिम महाराष्ट्रात पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे यात नागरिकांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे यात वित्तहानी,जीवित हानी झाल्याने अनेक नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे यात राज्यातुन अनेकविध ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू असताना एक हात मदतीचा या अंतर्गत पुरबाधित बांधवांना सढळ हाताने मदत व्हावी या हेतूने आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी चाळीसगाव तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यात अनेक सामाजिक सेवा संस्था यासह राजकीय पदाधिकाऱ्यांनी स्वेच्छेने मदतीचा हात पुढे करीत साधन सामुग्री सुपूर्द केली

आपण समाजाचे काही देने लागतो ही उदात्त भावना लक्षात घेत पूरग्रस्त बांधवांना जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आल्याचे राजीव देशमुख यांनी सांगितले तर नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी तालुक्यातुन जास्तीत जास्त मदत व्हावी यासाठी सर्व संघटनाना आवाहन केले तर सर्व पक्ष संघटनांना सोबत घेत राजीव देशमुख यांनी हातात घेतलेली मोहीम कौतुकास्पद असल्याचे जेष्ठ पत्रकार किसनराव जोर्वेकर यांनी सांगितले तर डॉ.सुनील राजपूत यांनी जास्तीत जास्त औषधींचा साठा उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे यांनी पुरबधित बांधवांना गरजेच्या वस्तू देण्याचे आवाहन यावेळी केले

किसनराव जोर्वेकर,कैलास सूर्यवंशी,नगरसेवक राजेंद्र चौधरी,सोमसिंग राजपूत,सुरेश चौधरी,प्रविणभाई पटेल,भोजराज पुन्शी,उद्धवराव महाजन,सुरेश स्वार,अशोक खलाने,प्रमोद पाटील,शशिकांत साळुंखे,नानाभाऊ पवार,संदीप बेदमुथा,शरद मोराणकर,योगेश भोकरे,संदीप जैन,किराणा भुसार असोसिएशन,फर्टिलायझर्स असोसिएशन,प्रदीप घोडके यासह अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने मदतीचा ओघ सुरू झाला असून उद्यापावेतो बऱ्याच प्रमाणात मदत दिली जाणार आहे तरी नागरिकांनी राजपूत मंगल कार्यालयात सुरू असलेल्या मदत केंद्राशी संपर्क साधावा यात

अमोल चौधरी- ९९६०६०८६१५

स्वप्नील कोतकर- ९८५००६६८४४

प्रकाश पाटील- ७०२०६०३४३४

शुभम पवार- ९९२१३१६००७

प्रताप भोसले- ९८८१३००७०२

कुशल देशमुख- ७५८८०५२१७२

यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.