भाजपाचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष बालाजी बच्चेवार यांच्याकडे जाण्याची शक्यता?

0

नांदेड  विभागीय प्रतिनिधी – भारतीय जनता पक्षाचे ग्रामिण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी भाजपाचे युवा नेते मा.जि.प.सदस्य बालाजी बच्चेवार यांच्याकडे दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे?

भाजपाच्या संघटन पर्व निवडणूक प्रक्रियाचा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आले असताना दि.1 ते 10 डिसेंबर दरम्यान नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याने भाजपाचे प्रमुख दावेदार असलेले युवा नेते बालाजी बच्चेवार यांनी शोसल मिडियाच्या माध्यमातून चांगलीच पसंती मिळविल्यामुळे  बालाजी बच्चेवार हे जिल्हाध्यक्षपदाच्या रेसमध्ये  आघाडीवर असल्याचे दिसत आहे सध्याचे नांदेड ग्रामिण जिल्हाध्यक्ष आ.राम पाटील रातोळीकर यांच्या जागी नव्या जिल्हाध्यक्षाची निवड केली जाणार असल्याने नविन व धडाकेबाज चेहरा म्हणून बालाजी बच्चेवार यांच्या नावाला जनसामान्यातून पसंती मिळत आहे जिल्हाध्यक्षपदासाठी अनेक दिग्गजांमध्ये रस्सीखेच जरी असली तरी बच्चेवार हे आक्रमक शैली व कोणतेही राजकीय वारसा नसताना जिल्ह्यातच नव्हे तर वरिष्ठ पातळीवर आपला ठसा उमटविला आहे केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी व माजी अर्थ मंत्री म.रा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे ते जवळचे विश्वासू मानले जातात.

गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून पक्षांमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक राजकीय चडउतार पाहिले एवढ्यावरच न थांबता पक्षवाढीसाठी प्रयत्न चालूच ठेवले भाजपाच्या अनेक ग्रामिण कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींनी बालाजी बच्चेवार यांना जिल्हाध्यक्षपदी विराजमान करावे असे मत व्यक्त केले त्यामुळे भाजपाचे युवा व धडाकेबाज युवा नेते बालाजी बच्चेवार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.