भडगाव पोलिस स्टेशनमधील बदली झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या अध्यक्षतेखाली भडगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलिस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे पोलिस हे.कॉ.ईश्वर पाटील, पो.हे.कॉ.लक्ष्मण पाटील यांची शासकीय नियमानुसार महाराष्ट्र पोलिस खाते अंतर्गत बदली झाली.

सदर अधिकारी कर्मचारी यांनी भडगाव शहर व तालुक्यसाठी कायदा व सुव्यवस्था, जातीय सलोखा, शांतता इत्यादि प्रशासकिय तथा सामाजिक उपक्रम सेवाकार्यात अतिशय मोलाची कामगिरी केली आहे. त्यानिमित्त महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजनाताई पाटील, उपाध्यक्षा मिनाताई बाग, सदस्या रेखाताई पाटील, सदस्या नूतनताई पाटील, सदस्या साजेदाबी शेख आदि महिला पदाधिकारी सदस्यांनी पोलिस निरीक्षक अशोकजी उतेकर यांचे उपस्थितित पोलिस उपनिरीक्षक सुशील सोनवणे पो.हे.कॉ.ईश्वर पाटील, हे.कॉ.मा.लक्षमण पाटील,यांचे सत्काररूपी अभिनंदन सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.