धक्कादायकː पर्म युनिवर्सिटीत अंधाधुंद गोळीबार; ८ ठार तर १४ जखमी (व्हिडीओ)

0

रशियाच्या पर्म युनिवर्सिटीमध्ये एका अज्ञात माथेफिरूने अंधाधुंद गोळाबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात तब्बल ८ जणांचा मृत्यू झाला तर जवळपास १४ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. या गोळीबारानंतर अनेकांनी आपला जीव वाचण्यासाठी पळापळ सुरु केली. अनेक विद्यार्थ्यांनी युनिवर्सिटीच्या इमारतीच्या मजल्यांवरून उड्या मारत आपली सुटका करुन घेतली. मात्र बहुतांश विद्यार्थी जखमी झाले आहेत. रशिया टुडेच्या माहितीनुसार, सोमवारी रशियन शहर पर्ममधील युनिवर्सिटी परिसरात एका बंदूकधारी व्यक्तीने अंधाधुद गोळीबार केला होता. ज्य़ात ८ जणांचा मृत्यू झाला तर सहा जखमी झालेत. मात्र हल्ल्य़ानंतर १४ पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये गोळीबारानंतर बिथरलेल्या अवस्थेतील विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उड्या मारताना दिसत आहे. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांनी खिडकीतून उड्या घेत याठिकाणाहून पळ काढला.

पर्म युनिवर्सिटीचे प्रवक्ते आणि पोलिसांच्या माहितीनुसार, मॉस्कोच्या १३०० किलोमीटर (८०० मैल) पूर्वेला पर्म स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये गोळीबार करणाऱ्या १८ वर्षीय बंदूकधारी आरोपी तिमूर बेकमानसुरोव ताब्यात घेण्यात आले आहे. हा ताब्यात घेतलेला बंदूकधारी व्यक्ती य़ुनिवर्सिटीतील एक विद्यार्थी असल्याचं समोर आलं आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मोठे हत्यार घेऊन युनिवर्सिटीच्या इमारतीमध्ये घुसताना दिसत आहे.

युनिवर्सिटी प्रबंधनाने सोमवारी सकाळी परिसरात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना याबाबत इशारा दिला होता. यावेळी विद्यार्थ्यांना शक्य असल्यास परिसर सोडा किंवा एखाद्या खोलीत बंद करुन घ्यावे असे आदेश दिले होते. रशियातील नागरिकांना बंदूक बाळगण्यास परवानगी नाही. पण शिकार, स्वरक्षण बंदूक खरेदी करु शकतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.