धार गावात अस्वच्छतेचा कळस; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष…

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यातील धार येथील  पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईला गळती असून धार ग्रामपंचायत ग्रामसेवक व सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील धार ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

धार गावाची समस्या उंबरठ्यावर असुन गटारीचेचे पाणी नळात जात आहे. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याने गावकरी नेहमीच साथीच्या आजाराच्या विळख्यात असतात.  कोरोना आजार आटोक्यात आल्यानंतर त्यात विविध साथींच्या आजाराचा धोका असतानाही गावात ठिकठिकाणी असलेले पाणी गळती बाबत कोणताच निर्णय घेतला जात नाही.

ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाकडुन पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड नागरिकांना कडुन केली जात आहे. याबाबत  ग्रामपंचायत प्रशासक स्तरावर कोणाही एक शब्द बोलण्यास तयार नाही. त्यात विविध आजाराचा धोका ही वाढत असून धार येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले असताना स्वच्छतेबाबत ग्रामपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुका रविंद्र भगवान पाटील पाटील यांनी केला आहे.

सर्वत्र कोरोनाचे थैमान आटोक्यात येत असतांना त्यात विविध  साथीच्या आजारांचा धोका वाढला असतानाही गावात ठिकठिकाणी असलेले उकिरडे हटविण्याबाबत निर्णय कुठलाही  घेतला जात नाही. ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभागाकडुन दुर्लक्ष केले जात असल्याची ओरड नागरिक करत आहेत. तसेच याकडे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंचासह सदस्य ही दुर्लक्ष करत असल्याचा आरोप  प्रहार जनशक्ती पक्ष युवक तालुका रविंद्र भगवान पाटील यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.