बेरोजगारांचा आक्रोश मोर्चा आज जळगावात धडकणार

0

न्याय हक्कासाठी भुसावळ ते जळगाव पायी प्रवास

भुसावळ :-लोकसंघर्ष मोर्चा व ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटीशीप संघटना व इतर संघटना , बेरोजगार मोर्चा यांच्या माध्यमातून लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून दिनांक 6 मार्च रोजी दुपारी तीन वाजता मोर्चा काढण्यात आला .
मोर्चात लोकसंघर्षचे चंद्रकांत चौधरी ,दिपक काठे , यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते . या मोर्चा करिता उत्तर प्रदेश , मुंबई , नागपूर , पुणे , नाशिक ,जळगाव यासह विविध भागातून रेल्वे अप्रेन्टिसधारक बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
हजारो तरुण आज बेरोजगारीच्या फे-यात अडकलेले दिसत आहे. मागील पाच वर्षापासून महाराष्ट्र सरकारने नोकर भरतीवर बंदी घातली असल्याने दहावी ते पदवी,आयटीआय,पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग करून देखील नोकरभरती बंद आहे. लाखांच्यावर रिक्त पदे असूनही त्या प्रमाणात भरती केली जात नाही ,सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींच्या पुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.या पार्श्वभूमीवर बेरोजगार तरुणांच्या प्रश्न निवारण्यासाठी प्रश्नाला वाचा फोडण्या साठी, भांडवलदारां सोबत जाणा-या सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी तरुणांच्या न्याय व हक्कासाठी युवकांनी एकत्र येऊन संघर्ष उभा करून .जात-धर्म भेद,स्त्री-पुरुष असमानता विसरून न्याय्य हक्कासाठी 06 मार्च रोजी दुपारी 3 वाजता भुसावळ येथील डीएस ग्राऊंड(डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान ) वरून जळगाव कडे रवाना झाला आहे . 06 मार्चला सायंकाळी नशिराबादला पोहोचून तिथेच मुक्काम करून त्याच ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे . व 07 मार्च रोजी सकाळी 09 वाजता नशिराबाद वरून निघून जळगाव येथे पोहोचत जिल्हाधिकार्‍याना निवेदन देण्यात येणार आहे .

या प्रमाणे मागण्या
ऑल इंडिया रेल्वे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये भरती करा व 20 टक्के कोटा त्वरित रद्द करा
महानिर्मिती,महावितरण, महापारेषण,ऑर्डनन्स फॅक्टरी,महाराष्ट्र एस टी महामंडळ येथील अप्रेंटिस विद्यार्थ्यांना कायम स्वरूपात नोकरी देण्यात यावी
ज्या क्षेत्रामध्ये तरुणांना प्रशिक्षित केले गेले त्या क्षेत्रातील काम न मिळाल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरमहा पाच हजार रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.