भडगांव नगराध्यक्ष पाटील यांचा राजीनामा

0

जळगांव/भडगांव. दि 6-
नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ मुदत ठरल्या प्रमाणे पुर्ण झाल्यामुळे भडगांव नगरपरीषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे नुकताच सुपूर्द केला. त्यांच्या जागी अमोल पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
भडगांव नगरपरीषदेची निवडणूक फेब्रुवारी 2015 मधे घेण्यात आली होती. त्यावेळी पक्षीय बलाबला नुसार राष्टवादी काँग्रेसचे प्रशांत पवार, श्याम भोसले यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला होता. तदनंतर राजेंद्र महादू पाटील यांनी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या कार्यकाळात अंचळगांव रस्त्यावरील घनकचरा प्रकल्प, त्या पासून सेंद्रीय खत निर्मिती, गिरणा काठाचे सुशोभीकरणासह शहराच्या हद्दीत गिरणा नदीपुलावर स्ट्रीट लाईट आदी लोकोपयोगी कामांना प्राधान्यक्रमाने न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. शिवाय सन 2017 मधे नगरपरीषदेचे कामकाज तत्कालीन मुख्याधिकारी राहुल पाटील यांच्या कार्यकाळात ऑनलाईन करण्यात आले होते. एवढेच नव्हेतर नगरपरीषद अस्तीत्वात येण्याअगोदर देखिल सरपंच, पंचायत समिती सभापती तसेच जिल्हा परीषद सदस्य असतांना देखिल भडगांव शहर तालुक्यासाठी लोकोपयोगी कामांना प्राधान्य दिले होते.
पहील्यापासुन पारदर्शक कामकाजाला प्राधान्य आहे. त्यामुळे नगर

Leave A Reply

Your email address will not be published.