बारामतीतून गोपीचंद पडळकर लढणार; मुख्यमंत्र्यांचे संकेत

0

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या विरोधात लढणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. पडळकर यांनी बारामतून लढावे, याबाबत लवकर पक्षश्रेष्ठींशी बोलून निर्णय जाहीर करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे.

गोपीचंद पडळकर यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. मात्र, आज त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यावेळी काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा आणि शिरपूर काग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनीही भाजपत प्रवेश केला. ‘गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे, ढाण्या वाघाने जंगलाच्या राजासारखं असावं, म्हणून माझं असं म्हणणं आहे की गोपिचंद पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचित केले आणि उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला दुजोरा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.