मनसे लढणार : 5 ऑक्‍टोबरला पहिली प्रचारसभा,राज ठाकरेंची घोषणा

0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. तसेच येत्या 5 ऑक्‍टोबरला मनसेची पहिली प्रचारसभा होणार असल्याचीही माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. सोमवारी वांद्रयातील एमआयजी मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणूक ताकदीनं लढवण्याची घोषणा केली.

दरम्यान, यावेळी मंत्रालयामध्ये विष प्राशन करुन आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. तसेच नाशिकचे शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी देखील मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.

या कार्यक्रमात राज ठाकरेंनी मनसे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. तसेच येत्या 5 ऑक्टोबरला पहिली प्रचारसभा घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मात्र ही प्रचारसभा कुठे असणार याची कोणतीही माहिती राज ठाकरेंनी दिली नाही. मनसे विधानसभेच्या किती जागा लढवणार याचीही काही माहिती राज ठाकरेंनी देणं टाळलं. 5 तारखेला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, असं राज ठाकरेंनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.