बापरे.. 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

0

नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाचा धोका कायम आहे.  त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आलीय.  व्यक्त करण्यात येत आहे. आता एक धक्कादायक बातमी आहे.

कोरोना विषाणूची लाट मंदावली असतांना राज्यात शाळा सुरु झाल्यानंतर 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

नवी मुंबईमधील घणसोलीयेथे शेतकरी विद्यालयातल्या 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या दोन दिवसात या विद्यालयातील 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेत. यानंतर नवी मुंबई महापालिकेने 375 विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी केली. तर आज 600 विद्यार्थ्याची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

घणसोलीतील शेतकरी विद्यालयात गेल्या दोन दिवसात 16 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या नातेवाईक मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तो मुलगा याच शाळेत येत होता. दरम्यान, या परदेशी व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.