बांभोरी जवळ दोन कारांची समोरासमोर जोरदार धडक

0

जळगाव-बांभोरी पुलाजवळ आज दुपारी दोन कारांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली. या अपघातात कारमधील एकाला मुकमार लागला. मात्र कार चे खूपच नुकसान झाले.

यावेळी महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, बांभोरी जवळील पोतदार इंटरनॅशनल स्कूलजवळ पाळधी कडून एमएच १९ सीव्ही-४८६१ हि कार जळगाव शहराकडे जात होती तर दुसरी कार क्रमांक एमएच १९ सीझेड २५८१ जळगाव शहराकडून पाळधीकडे जात असताना या दोघ वाहनांची समोरासमोर धडक झाली.

पाळधी कडे जाणाऱ्या कारचे चाक फुटल्याने कार चालकाचा ताबा सुटल्यामुळे जळगाव कडे येणाऱ्या राजन अट्रावलकर यांच्या गाडीवर आदळली.राजन अट्रावलकर यांच्या बरोबर त्यांची पत्नी, मुलगी, नातु आणि नात हे सर्व जळगावकडे प्रवास करत येत होते.

दैव बलवत्तर म्हणून अट्रावलकर परिवार वाचला
जळगाव कडे येणाऱ्या अट्रावलकर यांच्या गाडीतिल सर्वांनी सीटबेल्ट लावले होते आणि वेळेवर एअरबॅग उघडल्याने कोणासही इजा झाली नाही. गाडीची स्थिती पाहता फक्त दैव बलवत्तर म्हणूनच अशी बघ्यामध्ये चर्चा होती

Leave A Reply

Your email address will not be published.