दिलासादायक : जिल्ह्यात आज पुन्हा एकही मृत्यू नाही; ३५ नवे रुग्ण

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या ५० च्या आत आढळून येत आहे. आज दिवसभरात ३५ बाधित रूग्ण आढळले आहे. तर १०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. गेल्या २४ तासात एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाहीय.

आजच्या रुग्ण नंतर जिल्ह्यात एकूण. बाधित रुग्णांची संख्या १ लाख ४२ हजार १८६ वर गेली आहे. त्यापैकी १ लाख ३८ हजार ८१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २५७० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ८०२ रुग्णावर उपचार सुरु आहे.

जळगाव शहर- ०४ , जळगाव ग्रामीण- ०१ , भुसावळ- ०२ , अमळनेर-00 , चोपडा ०२, पाचोरा-०१, भडगाव-००, धरणगाव-०२, यावल- ०१, एरंडोल- ०२, जामनेर-०२, रावेर-०१, पारोळा-०२, चाळीसगाव-१४, मुक्ताईनगर-०१, बोदवड-०० आणि इतर जिल्हे ०० असे एकुण ३५ बाधित रूग्ण आढळले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.