खासदार रक्षा खडसे यांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून वर्णी लागणार….

0

भाजपा कोअर कमिटी मध्ये चर्चा…!

  • जळगाव जिल्ह्यातील भाजपा अधिक ताकदवान होण्यासाठी दमदार पाऊल
  • अनेकांच्या भुवया उंचावल्या
  • जिल्ह्यातील नेतृत्व बदलाचे संकेत
  • आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम

सध्याच्या घडीला ओबीसी समाजाचा एक प्रमुख चेहरा म्हणून रक्षा खडसे या भाजपा बरोबरच समाजात ओबीसींचे नेतृत्व करताना दिसत आहे एवढेच नव्हे तर भाजपाकडून देखील त्यांना पुढे केले जात आहे

फडणवीस यांच्या वर अत्यंत जळजळीत टीका~ एकाच समाजातील नेते एकमेकांशी वाद घालताना दिसतात. याचा अत्यंत ज्वलंत उदाहरण म्हणजे खासदार रक्षा खडसे व एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे. दोघी नात्याने ननंद-भावजय परंतु रक्षा खडसे या भाजपाच्या खासदार तर रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तून रोहिणी खडसे यांनी भाजपा वर देवेंद्र फडणवीस यांच्या वर अत्यंत जळजळीत टीका केली होती त्या म्हणाल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागा रद्द झाल्यास भाजपतर्फे ओबीसी उमेदवार देण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. त्यावर रोहिणी खडसे यांनी उत्तर दिले होते. त्यांनी म्हटले होते की, भाजपला ओबीसीचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?….आता गळा काढण्यात अर्थ नाही.

रक्षाताईंवर आंदोलनाची जबाबदारी~ आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये देखील उत्तर महाराष्ट्रात आंदोलनाचे नेतृत्व करण्याकरिता रक्षाताईंवर जबाबदारी सोपवण्यात आली  चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व देखील रक्षाताईंनी केले तर दुसरीकडे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची अनेक चिन्हे दिसत आहेत अशा घडामोडी देखील घडताना आपण पाहू शकतो मग ओबीसी समाजाचा एक सक्षम चेहरा एक सक्षम नेतृत्व म्हणून भाजपा खासदार रक्षा खडसे यांचे कडे  बघत आहे असं स्पष्टपणे दिसत आहे. 

ननंद भावजय आमने-सामने~ खासदार रक्षा खडसे यांनी आपल्या नणंद रोहिणी खडसे यांना पत्युत्तर देतांना म्हणाल्या की, जर भाजपाने ओबीसी नेतृत्व संपवण्याचे प्रयत्न केले असते ओबीसींना डावललं असत तर आज एक ओबीसी म्हणून मीही इथे नसते त्यामुळे उगाच आरोप करण्यात काही तथ्य नाही यावर तून खडसे कुटुंबियातील ननंद भावजय मध्येच चांगलाच कलगीतुरा पेटलेलं पहावयास मिळालं आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर तून ननंद भावजय आमने-सामने आलेल्या दिसतं आहेत.

राजकारणातील डावपेच कोणासाठीच नवीन नाही. अनेक वेळा एकच कुटुंब राजकारणातील एखाद्या पक्षाचा चेहरा ठरतो. ज्याला घराणेशाही देखील म्हटल जातं , तर दुसरीकडे अशी ही स्थिती बघायला मिळते, जिथे एकाच कुटुंबात अनेक पक्षांचे नेतृत्व वावरतांना दिसतात. पक्षांतर्गत मतभेद देखील पाहायला मिळतात. जो येतो तो आपलं ध्येय साध्य करून जातो ,  कधी जाती पाती वर तर कधी विकासकामांवर राजकारणी लोक मतांची मागणी करतात निवडून येतात.

रक्षाताईंची नवीन इनिंग तर अनेकांना चपराक ~ जर खासदार रक्षा खडसे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली तर रक्षा खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीतील ही एक नवीन इनिंग ठरेल एक टर्निंग पॉईंट ठरेल. त्याबरोबरच ओबीसी समाजाला एक नवीन नेतृत्व देखील मिळेल तसेच एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, पंकजा मुंडे या ओबीसी नेत्यांना भाजपाने डावललं असा आरोप करणाऱ्यांच्या तोंडावर देखील एक चांगला चपराक बसेल. 

महाराष्ट्र राज्यात सध्या मराठा आरक्षण असो अथवा ओबीसींचे रद्द केलेले आरक्षण असो किंवा धनगर आरक्षण असो असे आरक्षणाचे एक ना अनेक प्रश्न आज सर्वसामान्य माणूस उचलत आहे , मग त्या त्या समाजाला न्याय देण्यासाठी त्या त्या समाजातील नेते पुढे येतात .

देवेंद्र फडणवीस नाथाभाऊंच्या घरी ~ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरिता जळगाव मुक्ताईनगर दौरा केला होता त्यावेळी देखील देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे यांच्या घरी गेले रक्षा खडसे गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस तिथेही चर्चा झाली 

दोन संभाव्य खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात ~ महाराष्ट्रातून दोन संभाव्य खासदारांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात होऊ शकतो ज्यामध्ये मास्टर लिस्टमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार नारायण रणे, खासदार रक्षा खडसे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या नावाची देखील सध्या चर्चा सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.